स्कूलबस चालकाचा चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 05:07 AM2018-03-02T05:07:10+5:302018-03-02T05:07:10+5:30

स्कूल बस चालकानेच पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना वणी (लहान) मार्गावर मंगळवारी घडली. याप्रकरणी गुरूवारी केलेल्या तक्रारीवरून अजय ज्ञानेश्वर सोनोने (२४) रा. धामणगाव या नराधम युवकाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.

School Bus Driver's Chimukulla Torture | स्कूलबस चालकाचा चिमुकलीवर अत्याचार

स्कूलबस चालकाचा चिमुकलीवर अत्याचार

Next

हिंगणघाट (वर्धा) : स्कूल बस चालकानेच पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना वणी (लहान) मार्गावर मंगळवारी घडली. याप्रकरणी गुरूवारी केलेल्या तक्रारीवरून अजय ज्ञानेश्वर सोनोने (२४) रा. धामणगाव या नराधम युवकाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, येथून ७ किमी अंतरावरील वणी (लहान) या गावातील पीडित मुलगी स्कूल बसने रोज सकाळी येथील मुक्तांगण या बालवाडीत येते. स्कूल बस क्र. एमएच ३२ क्यू ३३६२ ही वणी, दारोडा व अन्य गावांतील विद्यार्थी घेऊन शाळेत ये-जा करीत होती. दारोडा व अन्य गावातील मुले-मुली आपापल्या घरी सोडल्यावर ही एकटीच मुलगी बसमध्ये राहते. २७ फेबु्रवारी रोजी बसचालक अजय सोनोने याने वणी गावाच्या रस्त्यावर निर्जनस्थळी बस थांबवून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. घरी गेल्याानंतर आईला संशय आल्याने तिने मुलीला विचारले असता मुलीने बसचालकाने केलेल्या कृत्याबाबत सांगितले. आईवडिलांनी दुसºया दिवशी मुक्तांगणच्या शाळा प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने लगेच पोलिसांना कळविले. पोलीस शिपाई राम इप्पर, उमेश लंडके यांनी त्वरित कारवाई करीत आरोपी अजय सोनोनेला ताब्यात घेतले. आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी भादंवि कलम ३७६ तथा पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार राजेंद्र शिरतोडे करीत आहेत.
>मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न
पालक चिमुकल्यांना स्कूलबस वा आॅटोने शाळेत पाठवितात; पण अशा घटनांमुळे स्कूल बसचालकांवरही पालकांचा विश्वास राहिलेला नाही. मग, मुला-मुलींना शाळेत पाठवायचे कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: School Bus Driver's Chimukulla Torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.