चार दिवसांपासून पुलगावकरांना पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 09:47 PM2019-04-12T21:47:38+5:302019-04-12T21:48:08+5:30

शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Pulgaonkar has no water supply for four days | चार दिवसांपासून पुलगावकरांना पाणीपुरवठा नाही

चार दिवसांपासून पुलगावकरांना पाणीपुरवठा नाही

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या काही विहिरी जमीनदोस्त : काहींचा कचरा टाकण्यासाठी होतोय वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी, कोट्यवधी रूपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पुलगाव बॅरेज आदी सर्व कार्यान्वित असल्या तरीही नदीवर बांधण्यात आलेल्या अप्पर वर्धा निम्न वर्धा धरणामुळे वर्धा नदीला पाणी नाही. अशा परिस्थितीत शहरात असणाºया जुन्या मोठ्या विहिरी भर उन्हाळ्यात शहरवासीयांची तहान भागवित होत्या. परंतु, मागील काही वर्षांत शहरातील काही मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या, तर काही विहिरींचा उपयोग शहरवासीयांनी केरकचरा टाकण्यासाठी केला.
साधारणत: मे, जून महिन्यात शहरात पाणी समस्या निर्माण होत असे. त्यावर उपाय म्हणून नगर प्रशासनाने शहरातील हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, बरांडा येथील मोठ्या विहिरींवर मोटारपंप बसवून शहरात टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करीत असे, परंतु मागील काही वर्षात दयालनगर, आठवडी बाजार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगतच्या विहिरी जमीनदोस्त केल्या. तर हरिरामनगर व गणेशनगर येथील विहिरींचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
रखरखते उन्ह व धरणातील पाण्याची पातळी पाहता वर्धा माई कोरडी झाली आहे. परिणामी पाणीपुरवठा करणारा जलकुंभ भरत नसल्यामुळे मागील चार दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शहरात असणाºया हापंपवर पहाटेपासून आई-बहिणी गर्दी करीत आहेत. खासगी विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी मिळणे कठीण झाले आहे.
पाणी समस्या सुटावी म्हणून वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज बांधण्यात येत आहे. हे काम मे २०१० मध्ये सुरू झाले असून अद्याप पूर्ण झाले नाही. उलट ९५ कोटी खर्चाचे बांधकाम ३०० कोटींवर पोहोचले तरी शहरवासी भर उन्हातही तहानलेलेच आहे. दोन वेळ पाणीपुरवठ्याचे बील घेणाºया नगर प्रशासनाचे शहरवासीयांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Pulgaonkar has no water supply for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.