दारू तस्करी रोखणे बेततेय पोलिसांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:26 AM2017-11-26T01:26:53+5:302017-11-26T01:28:17+5:30

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. यावर आळा घालण्याकरिता पोलिसांकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत आहे.

The prevention of liquor smuggled bettey police | दारू तस्करी रोखणे बेततेय पोलिसांच्या जीवावर

दारू तस्करी रोखणे बेततेय पोलिसांच्या जीवावर

Next
ठळक मुद्देठाणेदार गंभीर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर अपघात

ऑनलाईन लोकमत 
समुद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. यावर आळा घालण्याकरिता पोलिसांकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत आहे. यातच अवैध दारूची तस्करी रोखण्याकरिता खासगी वाहनांचा वापर सध्या वाढला आहे. अशाच खासगी वाहनातून दारूची तस्करी करणाºया वाहनाचा पाठलाग करताना समुद्रपूर येथील ठाणेदार प्रवीण मुंडे यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.
नागपूर-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूरकडे अवैधरित्या वाहनात दारूची वाहतूक होत आहे. हे कळताच ठाणेदार प्रविण मुंडे यांनी स्वमालकीच्या एमएच ३१ एफए ४१३६ क्रमांकाच्या वाहनाने समुद्रपूर-जाम मार्गाने निघाले. दरम्यान, ३३ केव्ही जवळ त्यांची गाडी रस्त्यावरील गिट्टीवरुन उसळत सरळ बाजूला असलेल्या खोल नालीत जाऊन धडकली. यात त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. मागाहून येत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रविण लिंगाडे यांच्या निर्दशनास हा अपघात येताच त्यांनी ठाणेदार मुंडे यांना वाहनातून बाहेर काढून उपचाराकरिता समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या अपघातामुळे दारूची अवैध वाहतूक करणाºया वाहनास पसार होण्यास मोकळा मार्ग मिळाला. चंद्रपूर जिल्हा दारुबंदी झाल्यापासून या मार्गे अवैध दारू वाहतूक वाढली आहे. या वाहतुकीला आळा घालणे पोलिसांच्या जीवावर बेतत आहे.
गतीकरिता खासगी वाहनांचा वापर
दारूची तस्करी करणाºयांकडे आधुनिक वाहने आहेत. ती १२० ते १५० च्या स्पीडने धावतात तर पोलिसांकडील वाहने ८० च्या वर जात नाही. यामुळे पोलिसांना खासगी वाहने वापरावी लागत आहेत. यात आर्थिकदृष्ट्या सधन असलेले कर्मचारी स्वमालकीची वाहने वापरताना दिसतात. काही कर्मचारी कुण्या सहकाºयांकडून ‘स्पॉन्सरशीप’ घेऊन वाहने घेत असल्याचे समोर आले आहे. काही भागात ही ‘स्पॉन्सरशीप’च दारू विक्रेत्यांकरिता मार्ग मोकळा करून देणारी ठरत आहे.

Web Title: The prevention of liquor smuggled bettey police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.