ओव्हरटेकच्या नादात दोन वाहनांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:11 AM2017-07-30T00:11:33+5:302017-07-30T00:12:16+5:30

येथील उड्डाणपुलाजवळ वाहनाला मागे टाकण्याच्या नादात दोन वाहनात धडक झाली.

ovaharataekacayaa-naadaata-daona-vaahanaancai-dhadaka | ओव्हरटेकच्या नादात दोन वाहनांची धडक

ओव्हरटेकच्या नादात दोन वाहनांची धडक

googlenewsNext
ठळक मुद्देवाहन उलटले : दोन्ही वाहनांचे चालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : येथील उड्डाणपुलाजवळ वाहनाला मागे टाकण्याच्या नादात दोन वाहनात धडक झाली. यात दोन्ही वाहनातील चालक जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली.
पोलीस सुत्रानुसार, येथून ब्रेड घेऊन जात असलेल्या मालवाहू वाहनाला अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या वाहनाने जबर धडक दिली. यात एम.पी. १० जी. १४२४ क्रमांकाचे वाहन जागीच उलटले तर धडक देणाºया त्यामुळे धडक देणाºया वाहनांचा समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
अपघात होताच येथील दुकानदार जाकीर मिस्त्री यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केले. जखमीमध्ये चालक नासीर अमजद खान तर दुसरा चालक धर्मेंद्रकुमार रायप्रीप्रसाद जाधव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठी मदत केली. जमादार कराळे यांनी वाहतूक सूरळीत केली. या घटनेची नोंद करण्यात आली असून क्रमांक नसलेले वाहन कोणाचे आहे, याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती आहे.

Web Title: ovaharataekacayaa-naadaata-daona-vaahanaancai-dhadaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.