वर्ध्यात पोलिस महिलेच्या विनयभंग प्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:22 PM2018-01-27T18:22:01+5:302018-01-27T18:22:15+5:30

पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांनी २५ जानेवारीला दिला.

One year rigorous imprisonment for police molestation case in Wardha | वर्ध्यात पोलिस महिलेच्या विनयभंग प्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास

वर्ध्यात पोलिस महिलेच्या विनयभंग प्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास

Next
ठळक मुद्देठोठावला तीन हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांनी २५ जानेवारीला दिला. मनीष बाबूराव धोंगडे असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्कुटीवर जाणाऱ्या शिपाई महिलेचा त्याने विनयभंग केला होता. त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली पीडिता २६ डिसेंबर २०१३ ला बहिणीच्या मुलासोबत दुचाकीने वर्धा येथून हिंगणघाटकडे येत होती. बहिणीचा मुलगा निखिल हा गाडी चालवत होता. सायंकाळी जामनी शिवारातुन जात असताना मागाहून येणाऱ्या दुचाकीचालकाने जवळ गाडी नेऊन तिचा विनयभंग केला होता. याप्रसंगी दोघांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमकही झाली होती. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेने आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक नोंदवून घेतला होता. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून दुचाकी क्रमांकावरून मालकाचे नाव पीडितेने प्राप्त केले. २९ डिसेंबरला हिंगणघाट पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी मनीष बाबुराव धोंगडे व गौरव देवेंद्र मुडे रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट यांना अटक केली.
सहायक पोलिस उपनीरिक्षक उमाकांत तळे यांनी तपास करून आरोपपत्र प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांच्या न्यायालयात सादर केले. चार साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.

Web Title: One year rigorous imprisonment for police molestation case in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.