महावितरणकडे अडीच हजार मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:15 PM2018-10-15T22:15:51+5:302018-10-15T22:16:33+5:30

ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे.

MSEDCL scarcity of 2.5 thousand meters | महावितरणकडे अडीच हजार मीटरचा तुटवडा

महावितरणकडे अडीच हजार मीटरचा तुटवडा

Next
ठळक मुद्देग्राहकांना फटका : डिमांड भरले; पण प्रतीक्षा कायमच

आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारले असता सारेच आलबेल असल्याचा दिखावा करीत आहे. परंतु, खºया अर्थाने ग्राहकांना मीटरअभावी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्यभरात मागील काही महिन्यापासून केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत जोडण्या देण्यात आल्या. तसेच जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मिटर व नादुरुस्त मिटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली; पण या मोहिमेंदरम्यान मिटरच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात महावितरण मागे पडले. परिणामी विद्युत जोडण्यांबाबत ग्राहकांकडून डिमांड भरल्यानंतरही मिटर उपलब्ध होऊ शकले नाही. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट विभागात जवळपास घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक उपयोगातील जवळपास २ हजार ५४७ मिटरची प्रतीक्षा कायम आहे. त्यापैकी तब्बल २ हजार १४० घरांमध्ये मिटर अभावी विद्युत पुरवठा पोहचू शकला नाही. नागरिकांना वेळेवर मिटर उपलब्ध न झाल्याने महावितरणच्याच कर्मचाºयांकडून ग्राहकांना चोरटा रस्ता दाखविला जात आहे. परिणामी ग्राहक पोलवरुन विद्युत चोरीचा पर्याय निवडत आहे. असाच प्रकार नुकताच घडलेल्या शहरातील एका घटनेवरुन चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे महावितरणच्या नियोजनशुन्यतेमुळे ग्राहकांवर विद्युत चोरीची वेळ आल्याची ओरड होत आहे.
२ हजार ७३८ कृषीपंपाना मिळाले नाही मीटर
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून मागील त्याला कृषीपंपासाठी विद्युत जोडणी देण्याची घोषणा शासनाने केली. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ विद्यूत जोडणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही महावितरणला करण्यात आल्या होत्या; पण अधिकाऱ्यांनी फारसे कानावर घेतले नसल्याने हल्ली जिल्ह्यात २ हजार ७३८ शेतकºयांच्या कृषीपंपाना मिटरमुळे विद्युत मिळू शकली नाही. यामध्ये आर्वी विभागातील आर्वी, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा व पुलगांव उपविभागत ७७६ मिटर पेंडींग आहे. हिंगणघाट विभागाच्या हिंगणघाट व समुदपूर उपविभागात १ हजार १७१ तर वर्धा विभागातील देवळी,सेलू व वर्धा उपविभागात ७०१ शेतकºयांना विद्युत मिटरची प्रतीक्षा आहे.

आता मिटर उपलब्ध झाले आहे. जेथे कमतरता असेल त्यांनी मागणी केल्यानंतर मिटर उपलब्ध होईल. मिटर वापराबाबती प्रक्रियापूर्ण केल्याशिवाय मिटर वापरता येत नाही. त्यामुळे थोडा विलंब झाला आहे, हा काही फारसा मोठा विषय नाही.
- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा.

Web Title: MSEDCL scarcity of 2.5 thousand meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.