अवैध उत्खननास उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:08 PM2018-08-12T23:08:28+5:302018-08-12T23:08:50+5:30

परिसरात सध्या ठिकठिकाणी अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. उत्खनन माफिया अवैधपणे मोठाले डोंगर पोखर करीत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. उत्खनन माफियांच्या या मनमर्जी कारभारावर महसूल व वन विभागाच्या अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केल्या जात आहे.

Invalid excavation extraction | अवैध उत्खननास उधाण

अवैध उत्खननास उधाण

Next
ठळक मुद्देमहसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका बघ्याची

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : परिसरात सध्या ठिकठिकाणी अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. उत्खनन माफिया अवैधपणे मोठाले डोंगर पोखर करीत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. उत्खनन माफियांच्या या मनमर्जी कारभारावर महसूल व वन विभागाच्या अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केल्या जात आहे.
तहसीलदाराच्या अंगावर धाव करण्यापर्यंतची मजल परिसरातील गौण खनिज तस्करांची गेल्याचे गत काही दिवसांपूर्वी येळाकेळी येथे घडलेल्या प्रकारावरून दिसून झाले. शिवाय आकोली भागात गेल्या सहा दिवसांपासून दिवसभर बिनबोभाट मुरुमाचे उत्खनन करून त्याची अवैधपद्धतीने वाहतूक केली जात आहे. याकडे वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. ज्या वन व महसूल अधिकाºयांच्या आशिर्वादाने सदर माफिया मोठे झाले तेच आता या अधिकाºयांना वाकुल्या दाखवित आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत आहेत. आकोली शिवारातील टेकडी परिसरातून दररोज सुमारे ५० ट्रॅक्टरची अवैध पद्धतीने मुरुमाची उचल केली जात आहे. इतकेच नव्हे तर तामसवाडा शिवारात हा प्रकार खुलेआम सुरू असल्याचे दिसून येते. यातील काही माफीयांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने प्रशासनाला ही कारवाई करण्यास अडचण येते अशी चर्चा प्रशासकीय वतुर्ळात आहे. त्यामुळे माफीयांची हिंमत वाढली आहे.
दररोज ५० ट्रॅक्टर मुरूमाची उचल
आकोली, तामसवाडा, रिधोरा या परिसरातून अवैध पद्धतीने उत्खनन करून दररोज सुमारे ५० ट्रॅक्टर मुरुमाची उचल केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. रिधोरा धरणाकडे तामसवाडा गावाकडून जाताना डाव्या बाजूला असलेल्या जंगलात अवैध उत्खनन करून मुरुमाची वाहतूक करण्यासाठी दररोज मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परंतु, वन व महसूल विभागाचे अधिकारी बघ्याचीच भुमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चेले-चपाटे ठेवतात पाळत
गौण खनिज तस्करांनी पोसलेले चेलेचेपाटे कुणी कारवाई करण्यासाठी तर आले नाही ना यासाठी दिवसभर घटनास्थळावरून पाळत ठेवत असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांच्याकडून तत्काळ माहिती झटपट अवैध उत्खनन करणाºयांपर्यंत व मालवाहू वाहनचालकांपर्यंत पोहोचते, हे विशेष.
क्षेत्र सहाय्यक व वनरक्षकाची धु्रतराष्ट्राची भूमिका
क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक हे दोन्ही प्रामाणिक असल्याचे बोलले जात असले तरी उत्खनन माफीयांकडून लावण्यात आलेला मनमर्जी कामाचा सपाटा त्यांना दिसत नाही काय, असा सवाल निसर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

आपण छापा टाकून होणारी कारवाई यशस्वी व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले. शासकीय वाहनातून तर मध्येच खासगी वाहनाचा प्रवास करून घटनास्थळ गाठत असलो तरी उत्खनन माफियांचे खबरी त्यांना बरोबरच माहिती देतात. त्यामुळे कारवाईत अडचणी निर्माण होत आहे. वेळीच उत्खनन माफियांना धडा शिकविल्या जाईल.
- एम.ए. सोनोने, तहसीलदार, सेलू.

तामसवाडा शिवारात ज्या ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे तो भाग महसूल विभागाच्या बोरखेडी साझात येतो. आपण त्या स्थळाची मोक्का पाहणी केली आहे. वनविभागाच्या हद्दीत अशा प्रकारचे उत्खनन होत असल्यास नागरिकांनी माहिती द्यावी.
- के. एम. वाटकर, क्षेत्र सहाय्यक, झडशी.

Web Title: Invalid excavation extraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.