काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसच्या थांब्यातून हिंगणघाट वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:39 PM2017-10-23T23:39:09+5:302017-10-23T23:39:32+5:30

काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस रविवारी सायंकाळी ७.३० वाजता येथील रेल्वे स्थानकावर पोहोचताच शेकडो नागरिकांनी रेल्वे परिसरात पोहोचून वर्धेकडे जाणाºया या रेल्वे गाडीला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदविला.

Hingangghat dropped from Kajipeth-Pune Express stoppage | काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसच्या थांब्यातून हिंगणघाट वगळले

काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसच्या थांब्यातून हिंगणघाट वगळले

Next
ठळक मुद्देकाळे झेंडे दाखवून केला निषेध : थांबा न दिल्यास आंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस रविवारी सायंकाळी ७.३० वाजता येथील रेल्वे स्थानकावर पोहोचताच शेकडो नागरिकांनी रेल्वे परिसरात पोहोचून वर्धेकडे जाणाºया या रेल्वे गाडीला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदविला. यावेळी थांबा देण्याच्या मागणीचे निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यामुळे काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
दिल्ली-मद्रास रेल्वेमार्गावरील या शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. इंग्रज राजवटीपासून या शहराला व्यापारिक महत्त्व असून काही कापड मिल, सूतगिरण्या राज्यातील प्रमुख बाजार समितीपैकी एक बाजार समिती, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, अनेक दाल मिल, आॅईल मिल, जिनिंग-प्रेसिंग, सोयाबीन प्रकल्प तसेच स्थानिक मोठी बाजारपेठे आहे. यामुळे हिंगणघाटचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातही येथील युवकांचा सहभाग लक्षणीय असून उच्च शिक्षण व नोकरी निमित्ताने पुणे- मुंबई आवागमन करणाºयाची संख्या मोठी असून सतत वाढतीवर आहे. हिंगणघाट, समुद्रपूर, वडकी, गिरड, सिर्सी, वडकी, पांढरकवडापर्यंतच्या प्रवाशांसाठी हिंगणघाट रेल्वेस्थानक सोयीचे आहे.
येथील रेल्वे मार्गावर पुणे तसेच मुंबई रेल्वे एक्स्प्रेस सुरू व्हावी म्हणून मागील अनेक वर्षांपासून मागणीला केंद्राने प्रतिसाद देत काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस सुरू केली. या रेल्वे गाडीच्या मागणीत हिंगणघाटच्या नागरिकांचा सिंहाचा वाटा असताना येथेच थांबा मिळाला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह, चंद्रपूर, वरोरा तसेच वर्धा, पुलगाव नंतर धामणगावला या गाड़ीला थांबा देण्यात आला. यामुळे हिंगणघाटला थांबा नाकारण्याचे कारण काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.
सदर मागणीचे निवेदन स्थानक व्यवस्थापक अरुण पटनायक यांना देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष गिरधर राठी, हरिदास मानेकर, दीवाकर गमे, अनिल गहेरवार, मनोज रूपारेल, राजू जोशी, नगरसेवक सौरभ तिमांडे, राजेंद्र पचोरी, अखिल धाबर्डे, महेंद्र पचोरी, शंकर मुंजेवार, दीपक माडे, हिंगणघाट पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रदीप आर्य, बाबू रूपारेल, अनिल हुरकट यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी गाडीला काळे झेंडे दाखवित नागरिकांनी निषेध नोंदविला तथा रोष व्यक्त केला.

सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडीबाबतही झाली होती चूक
चार वर्षांपूर्वी नागपूर - सिकंदराबाद रेल्वे एक्स्प्रेसच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय येथे गरजही होते; पण हिंगणघाटला थांबा मिळाला नाही. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने तांत्रिक चूक असल्याचे सांगून लवकरच येथे थांबा देण्याची ग्वाही देऊन समजूत काढली होती; पण तेव्हा झालेली चूक अद्यापही दुरूस्त करण्यात आलेली नाही. आजही गाडीला थांबा नाही. येथे गाडी थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Web Title: Hingangghat dropped from Kajipeth-Pune Express stoppage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.