ग्रामस्वच्छता हिच शहिदांना खरी आदरांंजली ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:35 AM2017-07-29T02:35:15+5:302017-07-29T02:35:43+5:30

केंद्र व राज्य शासन गावाचा विकास करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत.

garaamasavacachataa-haica-sahaidaannaa-kharai-adaraannjalai-tharaela | ग्रामस्वच्छता हिच शहिदांना खरी आदरांंजली ठरेल

ग्रामस्वच्छता हिच शहिदांना खरी आदरांंजली ठरेल

Next
ठळक मुद्देशैलेश नवाल : हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयात शहिदांना वाहिली श्रद्धांजली; चिमुकल्यांच्या कवायतींनी जिल्हाधिकारी

भारावले
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : केंद्र व राज्य शासन गावाचा विकास करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत. त्याची अंमलबजावणी स्वत:पासून करावी. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकरल्यास खºया अर्थाने त्याचा लाभ ग्रामस्थांना होईल. हिच स्वातंत्र्याकरिता शहीद झालेल्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी केले. ते शहीद स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य संग्राम सैनिक भाष्करराव ठाकरे, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुले वाचवा अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ. अनिरूद्ध पाटील, डॉ. अरविंद मालपे, विनायक पारे, भरत वणझारा, डॉ. किशोर गंजीवाले, विनायक होले, तहसीलदार सीमा गजभिये, ठाणेदार भगवान खारतोडे, राजकुमार सव्वालाखे, डॉ. विजय कळंबे आदी मंडळी मंचावर विराजमान होते.
प्रारंभी शहीद स्मृतीस्तंभावर अतिथींचे आगमन झाले. याठिकाणी शहिदांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमस्थळी अतिथिंंना एनसीसी व स्काऊट गाईड पथकाने सलामी दिली. यावेळी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यावर काढलेला लघुचित्रपट दाखविण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मी जिल्हाधिकारी बोलत नसून आष्टीचा नागरिक म्हूणून बोलत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:पासून बदलायला पाहिजे. तरच शहिदांची आठवण राहील, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात भाष्कर ठाकरे यांनी आष्टीच्या स्वातंत्र्यलढ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, तालुक्याला शहीद म्हणून शासनदरबारी नोंद व्हावी, असे आवाहन केले. उपस्थितांनी समायोतिच मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन धर्मेंद्र ताटीसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार भरत वणझारा यांनी मानले.
या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलन करीत जिल्हाधिकाºयांना शहीद स्तंभाकडे नेले. विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाचे जिल्हाधिकाºयांनी कौतुक करीत आष्टीच्या विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

Web Title: garaamasavacachataa-haica-sahaidaannaa-kharai-adaraannjalai-tharaela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.