वर्धेत नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:23 PM2017-11-11T22:23:18+5:302017-11-11T22:23:29+5:30

वर्धा जिल्हा मुख्यालयासाठी नवे अत्याधुनिक बसस्थानकाचे निर्माण होत आहे. ७ कोटी ७ लाख रुपये खर्च करून निर्माण होणाºया या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे परिवहन ....

The foundation stone of the new state-of-the-art bus station in Wardha | वर्धेत नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची पायाभरणी

वर्धेत नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची पायाभरणी

Next
ठळक मुद्देदिवाकर रावते : माणुसकीची जाणीव ठेवून काम करा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्हा मुख्यालयासाठी नवे अत्याधुनिक बसस्थानकाचे निर्माण होत आहे. ७ कोटी ७ लाख रुपये खर्च करून निर्माण होणाºया या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे परिवहन व खार विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
बसस्थानकाची पुनर्बांधणी, आधुनिकीकरण आणि नूतनीकरणाच्या या कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, आ. डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे, नगर परिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, वर्धा विभाग नियंत्रक राजेश आडोकार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. रावते म्हणाले की, एक सामान्य माणूस म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास केला आहे. त्यामुळे या अनुभवाचा फायदा बसस्थानक आणि बसच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी होत आहे. त्याचबरोबर महामंडळाचे पुरुष व महिला कर्मचारी आणि प्रवासी यांच्यासाठी काम करताना माणुसकीची जाणीव जागृत ठेवून काम केले तरच होणारा बदल महत्त्वाचा ठरेल. योजना या जनता आणि कर्मचाºयांच्या हिताच्या असल्या पाहिजेत. त्यांचा फायदा ५० टक्के या पिढीला आणि ५० टक्के पुढच्या पिढीला मिळेल, असा दूरदृष्टीकोन ठेवून नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. कर्मचाºयांना काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, तेव्हाच तो चांगल्या मानसिकतेने काम करू शकेल. म्हणून रात्र पाळीत काम करणाºया चालक व वाहकांसाठी बस स्थानकावर वातानुकूलित निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खा. रामदास तडस म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामुळे आज वर्धेत आधुनिक बसस्थानकाचे भूमिपूजन झाले आहे. गावोगावी प्रवाशांसाठी प्रवासी निवारेसुद्धा बांधून देण्यात यावेत, अशी मागणी केली. देवळीलाही नवीन बसस्थानक बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी रावते यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
आ.डॉ. पंकज भोयर यांनी नवीन बसस्थानकामध्ये पूर्वीच्या दुकानदारांना गाळे वाटप करताना प्राधान्य द्यावे. सेलू बसस्थानकाच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात यावी. वर्धेत शिवशाही बस सेवा सुरू करावी, अशी मागणी यावेळी केली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे जिल्ह्यात विविध चांगल्या वास्तू बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ शकले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपाचे सुनील गफाट यांनी यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शुभसंदेश वाचून दाखविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा विभागाचे विभाग नियंत्रक राजेश आडोकार यांनी केले. संचालन बाभरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाहतूक अधिकारी सुतोने यांनी मानले. कार्यक्रमाला भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा नागरिकांची उपस्थिती होती.

स्वच्छतेवरून कर्मचाºयांची कानउघाडणी
कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी ना. रावते यांनी वर्धा बसस्थानकाची पाहणी केली. ना. रावते यांनी बसस्थानकावरील अस्वच्छतेवरून कर्मचाºयांची चांगलीच कान उघाडणी केली. विशेष म्हणजे, मंत्री महोदय येणार असल्याने महामंडळाच्या अधिकाºयांनी बसस्थानकाची विशेष स्वच्छता केली होती. यातही परिवहन मंत्र्यांनी अस्वच्छता शोधून काढत जिल्ह्याच्या अधिकाºयांच्या दिखावू कामाचे पितळ उघडे पाडले. यावेळी अधिकाºयांनी आपल्या चुकीचे खापर कर्मचाºयांवर फोडण्याचा प्रकार केला.
वर्धेतून लवकरच तीन शिवशाही बस
प्रवाशांचा लांबचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून काही जिल्ह्यात शिवशाही ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. वर्धेतही लवकरच वर्धा - पुणे, वर्धा- औरंगाबाद, हिंगणघाट - शिर्डी, अशा तीन शिवशाही बस सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बसला प्रवाशानी चांगला प्रतिसाद दिल्यास १० बसेस सुरू करण्यात येतील. वर्धा जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करू, अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

Web Title: The foundation stone of the new state-of-the-art bus station in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.