डॉ.आंबेडकरांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:41 PM2018-04-14T22:41:10+5:302018-04-14T22:41:10+5:30

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे.

Extend thoughts of Dr. Ambedkar to the end of society | डॉ.आंबेडकरांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवा

डॉ.आंबेडकरांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवा

Next
ठळक मुद्देरामदास तडस : सामाजिक न्याय दिनाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे, डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. यामुळे त्यांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
देवळी नगर परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ व्या जयंती निमित्य सामाजिक न्याय दिवस कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला खा. रामदास तडस यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर नगर परिषद देवळी द्वारे आयोजित सामाजिक न्याय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, न.प. सभापती सारिका लाकडे, कल्पना ढोक, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे उपस्थित होते.
खा. तडस पुढे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालत त्याला कृतीची जोड दिली. ही सर्व हिंमत त्यांना अभ्यासातून प्राप्त झाली, यात दुमत नाही. यामुळे त्यांनी नेहमीच वाचनाला महत्त्व दिले. शिक्षण म्हणजे वाघिणीच दूध त्यांनीच समाजाला पटवून दिले. या शिक्षणातूनच त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दु:ख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले ज्ञान, माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविली. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, न.प. सभापती कल्पना ढोक, सुनीता बकाणे, न.प. सदस्य नंदकिशोर वैद्य, पवन महाजन, मिलिंद ठाकरे, मिलिंद ठाकरे, मारोतराव मरघडे, संध्या कोरोटकर, अश्विनी काकडे, संगिता कामडी, राजश्री देशमुख, संगीता तराळे, अब्दुल नईम, नगर परिषद कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Extend thoughts of Dr. Ambedkar to the end of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.