अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:13 PM2018-11-15T22:13:57+5:302018-11-15T22:14:31+5:30

यंदा पावसाने दडी मारल्याने आष्टी तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यांच्या झळा जाणवायल्या लागल्या आहे. आष्टी तालुक्यात बोरखेडी, थार, पंचाळा, किन्ही, मोई, तांग या भागात कोणी पाणी देता का पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Due to low rainfall due to very low rainfall | अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट

अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट

Next
ठळक मुद्देआष्टी तालुक्यात भीषण परिस्थिती : थार गावात महिला अडीच किमीवरून आणतात पिण्यासाठी पाणी

पाणीसंकट तीव्र होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यंदा पावसाने दडी मारल्याने आष्टी तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यांच्या झळा जाणवायल्या लागल्या आहे. आष्टी तालुक्यात बोरखेडी, थार, पंचाळा, किन्ही, मोई, तांग या भागात कोणी पाणी देता का पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. थार येथे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अडीच किमी अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणण्यात येत आहे. राज्य सरकारने आष्टी येथे चारा डेपो सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. अनेक तालुक्यात आताच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. दुसरीकडे येत्या एक ते दीड महिन्यात पाण्याचे टॅकर सुरू करून लोकांना पाणी पुरवावे वागणार आहे. शासन त्यातून कशी पळवाट काढता येईल या दुष्टीनेच या संकटाकडे पाहत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यापर्यंत ज्या पध्दतीने मदत जायला पाहिजे त्या प्रमाणात यंत्रणा कामाला लागल्याचे कुठेही दिसत नाही. जनावरासाठी चारा, पाणी, पिण्याचे पाणी याकडे लक्ष दिले जात नाही. कुटूंबातील काही लोक दोन-दोन कि.मी जनावरासाठी व आपल्यासाठी पिण्याचे पाणी आणतात. प्रशासनाचे यावर संपूर्ण दुर्लक्ष आहे. प्रशासनाचा कल फक्त चाल ढकल करण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. केवळ कागदोपत्री आकडेवारी आणि बातम्या देवून प्रशासन किती जोमाने काम करतात हा दिखावा करण्याचा काम फक्त प्रशासन करीत आहे. खेड्यातील लोकांमध्ये अशिक्षीतेचे प्रमाण जास्त असल्याने त्या लोकाच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे. कोणीच शेतकºयाला प्रत्यक्ष भेटून पाण्याची , दुष्काळी परिस्थिती जाणून घेत नाही. काही प्रशासनातील अधिकारी पाहणी न करता सरकारकडे अहवाल सादर करतात. आष्टी तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी या भागात अजुनही रोहयोची कामे सुरू करण्यात आलेली नाही. तसेच दुष्काळग्रस्त भागाला दिल्या जाणाºया सवलतीची माहितीही नागरिकांना देण्यात आलेली नाही. भारनियमनामुळे या भागात आणखीनच समस्या वाढली आहे.

वर्धा जिल्ह्यात यावर्षी केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. जिल्ह्यातील १० जलाशयांपैकी केवळ एक जलाशय १०० टक्के भरले. उर्वरित जलाशयांत पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे विविध गावातील जलस्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारने संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना केवळ काही गावेच टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातील सर्वत्र तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचेही संकट भीषण स्वरूपात राहणार आहे. आष्टी तालुक्यात थार गावात आताच अडीच किमी अंतरावरून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. जनावरांच्या चाºयांचा व पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करून आहे.

जानेवारी, फेब्रुवारी पासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. त्यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजनाा करायला हव्या. दुष्काळाचा सामना करताना लोकसहभाग महत्वाचा आहे. म्हणून प्रशासनाने गावा गावाचे दौरे करून काय मदत देवू केली ते जाहीर करावे. फक्त ठरावीक लोकानाच त्याचा फायदा होईल, असाा राजकीय दृष्टीक्षेप असायला नको, बाकीच्या लोकापर्यंत ही मदत पोहचली पाहिजे हा हेतू प्रशासनाचा व राजकीय पक्षाचा असला पाहिजे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करताता जाहीर केलेली मदत शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी व्यापक काम करण्याची गरज आहे.
वर्धा जिल्ह्यात सुरूवातीला तीन तालुके टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने यातील समुद्रपूर तालुका वगळला, त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काही ठराविक गावे टंचाईग्रस्त घोषित केले आहे. या गावात पाणी पातळी खालावलेली असून प्रशासनाने केवळ टंचाईग्रस्त गावांची नावे जाहिर केली आहे. आष्टी तालुका सर्वाधिक संवेदनशील तालुका आहे. या गावात सर्वात जास्त गावे टंचाईग्रस्त भागात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेवून या गावातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात पाणी पातळी खालावली आहे. तसेच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न एैरणीवर आला आहे. अनेकांनी आपली जनावरे दुसरीकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तर काही जण जनावरे विकत आहे.

Web Title: Due to low rainfall due to very low rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.