दव गेल्याने पिकांचे नुकसान

By admin | Published: December 30, 2014 11:42 PM2014-12-30T23:42:23+5:302014-12-30T23:42:23+5:30

आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने

Crop damage due to dew | दव गेल्याने पिकांचे नुकसान

दव गेल्याने पिकांचे नुकसान

Next

साहूर : आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने ही स्थिती पालटण्याचे चिन्ह दिसत नाही. थंडीचा कडाका वाढल्याने दव कमी झाले आहे. यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवाव, तसेच आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
यावर्षींचा हंगाम सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी साडेसाती घेवुन आला होता. दीड महिना पाऊसच उशीरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उशीराने झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५० टक्के उत्पादन तेव्हाच घटले. त्यातही पाऊस अपुरा आल्याने व लवकरच निघुन गेल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनात पुन्हा घट झाली. यावर्षी पाऊसच कमी आल्याने विहिरींना पाणी कमी आहे. संकटाचा सामना करूनही उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी असतांना साहूर व परिसरात शीतलहर आल्याने दव गेले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीतील कापूस, तूर, मिरची व बागायची पीक धोक्यात आले आहे. पिकांचे रक्षण करून त्यांना वाढवतात. मात्र अस्मानी संकटामुळे हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे.
पिकांवरील रोगराई, मजूर, कृषी केंद्र संचालक व व्यापारी यांचा सामना करून शेतकरी पिचला आहे. यातही उरले सुरले पीक निसर्ग कोपून शेतकऱ्याला उध्दवस्त करतो.
शेतकरी मरणासन्न अवस्थेत असून आर्थिक मदत देणे अनिवार्य झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाच वर्षापासून हुकमी व कमी खर्चाचे समजल्या जाणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगा देत आहे. यावर्षी कापसानेही दगा दिला आहे. दुष्काळाचे सावट पसरल्याने स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नापिकी व दवाच्या चक्रव्युहात सापडलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे. या भागातील पाहणी करून याचा अहवाल तयार करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)

Web Title: Crop damage due to dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.