वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:25 AM2018-06-13T00:25:36+5:302018-06-13T00:25:36+5:30

ओबीसीची जनगणना २०११ मध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. याची आकडेवारी शासनाजवळ जमा आहे. मात्र, ती जाहीर केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सध्या जाहीर असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे.

Create a fight for the right to justice | वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारा

वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारा

Next
ठळक मुद्देछगन भुजबळ यांचे ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ओबीसीची जनगणना २०११ मध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. याची आकडेवारी शासनाजवळ जमा आहे. मात्र, ती जाहीर केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सध्या जाहीर असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे. तसेच ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीय समाजाला शिष्यवृत्ती देण्यात अडचणी आणल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी, ओबीसी, मागासर्गीय, विद्यार्थी व वंचितासाठी लढा उभारा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
समता परिषदेच्या वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांची मुंबई येथे त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, संजय म्हस्के आदी उपस्थित होते. जुलै महिन्यात सेवाग्राम येथे समता परिषदेच्यावतीने जनगणना परिषद व ओबीसी मागासवर्गीय शिष्यवृत्ती यावर प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी यावे, अशी विनंती भुजबळ यांना करण्यात आली.

Web Title: Create a fight for the right to justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.