इतवारा गाठून कार्बाईडचे पटवून दिले दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 08:56 PM2019-05-15T20:56:15+5:302019-05-15T20:57:10+5:30

इतवारा बाजार परिसरात सर्व खाऊक फळ विके्रत्यांकडून विविध फळे पिकविल्या जातात. फळ पिकविताना कार्बाईडचा वापर इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारा ठरतो. पिकविलेल्या फळातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी इतवारा परिसर गाठून कारबाईडचा वापर कसा धोक्याचा आहे हे तेथील फळ विक्रेत्यांना पटवून दिले.

Corrected carbide after reaching it | इतवारा गाठून कार्बाईडचे पटवून दिले दुष्परिणाम

इतवारा गाठून कार्बाईडचे पटवून दिले दुष्परिणाम

Next
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम : फळ व्यावसायिकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इतवारा बाजार परिसरात सर्व खाऊक फळ विके्रत्यांकडून विविध फळे पिकविल्या जातात. फळ पिकविताना कार्बाईडचा वापर इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारा ठरतो. पिकविलेल्या फळातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी इतवारा परिसर गाठून कारबाईडचा वापर कसा धोक्याचा आहे हे तेथील फळ विक्रेत्यांना पटवून दिले. फळ व्यावसायिकांसाठी सुरक्षित फळ योग्यरीत्या पिकविण्याबाबत यावेळी एकप्रकारे अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने कार्यशाळाच घेण्यात आली.
शहरातील इतवारा मार्केट येथील सर्व पाऊक फळे विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अचानक भेट घेत त्याच्याकडून कशा पद्धतीने फळ पिकविली जात आहेत याची तपासणी करण्यात आली. तसेच आंबे आणि इतर फळ कशा पद्धतीने पिकविण्यात यावेत याबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. सध्या आंब्याच्या मागणीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी कार्बाईडने फळ पिकविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या चमुने बुधवारी इतवारा मार्केट गाठले. शिवाय सर्व फळविक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली. यावेळी सदर फळ विक्रेते आंबे कार्बाईडने पिकवित नसल्याचे आढळून आले. असे असले तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी काही फळविक्रेत्यांकडून पिकलेल्या आंब्याचे चार नमुने गोळा करून ते विश्लेशनासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, ल.प. सोयाम, घ.पं. दंदे यांच्यासह इतवारा बाजार परिसरातील प्रमुख फळ विक्रेत्यांची उपस्थिती होती.
दक्ष राहूनच इथपॉनचा वापर करावा - गोरे
आंबे पिकविण्यासाठी शासनाने इथपॉन पुडीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी सदर पुडीचा आंब्याला सरळ स्पर्श न करता ही पुडी आंब्याच्या कॅरेटमध्ये खाली ठेवावी. शिवाय त्यावर कागद ठेऊन त्यात आंबे पिकविण्यात यावे. त्यामुळे वायु रूपातील इथिलीनमुळे आंबे पिकण्यास मदत होईल. या पद्धतीने आंबे पिकविणे हे सुरक्षित असल्यामुळे शासनानेही त्याला मंजुरी दिली आहे. एकूणच दक्ष राहून इथपॉनचा वापर करण्यात यावा, असे यावेळी अन्न व औषध प्रशासन (अन्न) चे सहाय्यक आयुक्त जी. बी. गोरे यांनी सांगितले.

Web Title: Corrected carbide after reaching it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fruitsफळे