वेबसाईटवर माहिती टाकताना नागरिकांनी दक्ष राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:58 PM2018-01-24T23:58:32+5:302018-01-24T23:58:45+5:30

सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत.

Citizens should be cautious while throwing information on the website | वेबसाईटवर माहिती टाकताना नागरिकांनी दक्ष राहावे

वेबसाईटवर माहिती टाकताना नागरिकांनी दक्ष राहावे

Next
ठळक मुद्देनिर्मलादेवी एस. : सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत. नागरिक म्हणून आपण विविध मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी केले. त्या सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. पुढे म्हणाल्या, पत्रकारांनी कुणाचीही फसगत होऊ नये म्हणून याबाबत योग्य माहिती घेऊन सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.
पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात सदर कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
केंद्र शासनाने देशातील ४२ अ‍ॅपवर बंदी घातलेली आहे. त्यात ट्रू कॉलरचाही समावेश आहे. ट्रू कॉलर अ‍ॅप डाऊन लोड केल्यास नागरिकांची फसगत होऊन नुकसान होऊ शकते, अशी माहिती याप्रसंगी सायबर विशेषतज्ञ कुलदीप टांकसाळे यांनी दिली.
सदर कार्यशाळेत कुलदीप टांकसाळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची माहिती दिली. एचटीटीपीएस असलेली संकेत स्थळे वैद्य असतात. अनेकदा बनावट संकेत स्थळाद्वारे नागरिकांना फसविले जाते. यासाठी नागरिकांनी संकेत स्थळावर माहिती देताना ते बनावट नाही ना याची खात्री करावी. बँकींगचे व्यवहार करताना आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नये. नागरिकांची एटीएम द्वारे बँक खात्याची फसगत झाली असल्यास ४ ते २४ तासाच्या आत सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी. यासाठी बँक स्टेटमेंट सोबत न्यावे. यामुळे गुन्हेच्या तपासात मदत होत असून गुन्हेगाराचा शोध घेण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.
इंटरनेट स्वस्थ आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात वैयक्तिक माहिती मोबाईल अ‍ॅप आणि संकेत स्थळाच्या माध्यमातून टाकत असतो. महाजालातील माहिती पूर्णत: सुरक्षित असते असे नाही असे यावेळी टांकसाळे यांनी स्पष्ट केले.
सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार सांगत टांकसाळे यांनी इंटरनेट बँकींग, फिशिंग, हॉकिंग, स्मिशिंग, नोकरी विषयक फसवणूक, वैवाहिक फसवणूक, शैक्षणिक फसवणूक इत्यादी प्रकारची माहिती उपस्थितांना दिली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी जिल्ह्यात सायबर क्राईमचे ५३ गुन्हे दाखल असून २४ गुन्हे एटीएम बँकींगचे आहेत. यातील १२ गुन्ह्याच्या तपासामध्ये २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधीकडून सामान्य जनतेला सायबर सुरक्षविषयी जागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मनीषा सावळे यांनी ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र अंतर्गत पत्रकार आणि प्रसार माध्यमासाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेशसिंह यांचे संकल्पनेतून राबविण्यात येते आहे.

Web Title: Citizens should be cautious while throwing information on the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.