विदर्भातील केळीचा कॅलिफोर्निया झाला रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:56 PM2018-01-24T23:56:34+5:302018-01-24T23:56:56+5:30

जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळीचा कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात प्रसिद्ध होता. परंतु, आता या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे केळीचे बगीच्याची लागवड आता बंद झाली आहे.

Californian banana in Vidarbha became empty | विदर्भातील केळीचा कॅलिफोर्निया झाला रिकामा

विदर्भातील केळीचा कॅलिफोर्निया झाला रिकामा

Next
ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी लागवड केली बंद : भावापेक्षा खर्च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळीचा कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात प्रसिद्ध होता. परंतु, आता या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे केळीचे बगीच्याची लागवड आता बंद झाली आहे. शासनाचे विदर्भातील केळी उत्पादकांच्या अडचणीकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याने केळी उत्पादक आता दुसºया पिकांकडे वळले आहे.
विदर्भात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात येत होती. या भागात ओलिताची सोय असल्याने केळी पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत होते. या केळीच्या पिकाला मध्यप्रदेशासह देशाच्या विविध भागात पाठविण्यात येत होते. सेलू येथे मोठे व्यापारी केंद्र केळीच्या बाजारपेठेच्या रूपाने उपलब्ध होत. परिसरातील २० ते २५ गावात केळी पिकाची लागवड शेतकरी करीत होता. मात्र, अलिकडे जंगली श्वापदांचा (रानडुक्कर) याचा त्रास या भागात मोठ्या प्रमाणावर वाढला. तसेच भारनियमनाच्या वेळा बदलल्या. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतामानात केळीचे पीक टिकवून ठेवणे कठीण जावू लागले. केळी पिकाचा खर्च व त्याला मिळणारा भाव याचा समीकरण जुळणे कठीण होवू लागले. केळी पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संचही खरेदी केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या पवनार येथे आल्या असता त्यांना सेलू परिसरातील काही केळी उत्पादकांनी केळीचा एक मोठा घड भेट म्हणून दिला होता; पण भारनियमनामुळे त्या माध्यमातूनही ओलित करणे शक्य होत नसल्याने सध्या सेलू तालुक्यातील केळी उत्पादक शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.
पील खरेदीचा खर्च वाढला
पूर्वी सेलू तालुक्यात केळीचे ट्रकद्वारे खानदेशातून पील आणण्यात येत होते. ते शेतकऱ्यांना किरकोळ दराने विकल्या जात होते. या माध्यमातून केळीचे उत्पादन शेतकरी घेत होते. परंतु, आता केळी उत्पादन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जे शेतकरी केळीचे उत्पादन घेतात ते टिश्यू केळीचा वापर पील म्हणून करू लागले आहे. साधारणत: २०० रूपयाला एक याप्रमाणे हे पिल उपलब्ध होतात. यातून अधिक किलो वजानाच्या केळीचे उत्पादन घेतले जाते. आता काही ठराविक गावातच विशिष्ट बगीचे केळीचे उरलेले आहेत.
उरल्या केवळ स्मृती
१९७५ मध्ये आणीबाणी लावण्यात आली होती. त्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार विराजमान झाले. या सरकारच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पवनार येथे आल्या होत्या. यावेळी सेलू परिसरातील नागरिकांनी इंदिरा गांधींना एक मोठा घड भेट दिला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसचे तत्कालीन खजीनदार सिताराम केसरीही त्यांच्या सोबत होते.

केळीचे पिकाला भरपूर पाण्याची गरज असते. ऐन ओलिताच्यावेळी विहिरीला पाणी असतानाही भारनियमनामुळे ते करणे शक्य होत नाही. उन्हाळ्यात पीक वाचविणेही कठीण होते. त्यातच योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे गत सात वर्षांपासून केळीचे पीक घेणे बंद केले.
- श्याम बोबडे, शेतकरी, वडगाव (कला).

केळीचे पीक घेताना शेणखताचा व रासायनिक खताचा वापर केल्या जातो;पण त्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. त्यातच भावातील घसरण अडचण वाढविणारी आहे. केळीचे उत्पादन न परवडणारे असून केळीचे पीक घेणे बंद केले. भाजीपालाचे पीक घेत आहो.
- अनिल राऊत, शेतकरी, घोराड.

वादळ वारा यामुळे गत दोन वर्षांअगोदर मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. यामुळे यातून आर्थिक दृष्ट्या सावरणे कठीण झाले. यातच केळीची लावण, चाळण वाफ ओढणे आदी कामासाठी मजूर मिळेनासे झाले आणि उत्पन्न हातात येईपर्यंत चिंता करावी लागत होती. म्हणून केळी लावणे बंद केले आहे.
- अमर धोटे, शेतकरी, किन्हीमोई.

Web Title: Californian banana in Vidarbha became empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.