छाननीत ७५ अर्ज ठरविले बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:12 PM2019-03-12T22:12:53+5:302019-03-12T22:13:33+5:30

येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून सोमवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासह ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली.

After filing 75 applications decided | छाननीत ७५ अर्ज ठरविले बाद

छाननीत ७५ अर्ज ठरविले बाद

Next
ठळक मुद्दे२९८ ग्रा.पं.ची निवडणूक : आता अर्ज मागे घेणाऱ्यांकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून सोमवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासह ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली. या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान सरपंचपदासाठी २० तर ग्रा.पं. सदस्यपदासाठीचे ५५ अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. नामनिर्देशनपत्र छाननीची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली असून बुधवार १३ मार्चला कुठल्या उमेदवार अर्ज मागे घेतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.तील एकूण ९४६ प्रभागांचे लोकप्रतिनिधी तसेच २९८ सरपंच ग्रामीण भागातील मतदार या निवडणुकीच्या निमित्ताने निवडूण देणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २४ मार्चला निवडणूक होऊ घातली आहे. वर्धा तालुक्यातील ५६, देवळी ४६, सेलू ३१, आर्वी २२, आष्टी (श.) १७, कारंजा (घा.) ३४, हिंगणघाट ५६ तर समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रा.पं. मध्ये निवडणूक होणार असून ग्रा.पं. सदस्यांसाठी एकूण ५ हजार ९२३ तर सरपंचपदासाठी एकूण १ हजार ४३२ इच्छुकांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीच्या दिवशी ग्रा.पं. सदस्यपदासाठीचे ६२ तर सरपंचपदासाठीचे १३ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ग्रा.पं.सदस्यपदासाठी ५ हजार ८६६ तर सरपंचपदासाठी १ हजार ४१२ नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वर्धा तालुक्यातील सहा ग्रा.पं.तील अर्ज अडकले चाळणीत
वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी), पवनार, मांडवा, वायफड, बोरगाव (मेघे) अन् सावंगी (मेघे) या ग्रा.पं.तील अर्ज छाननी दरम्यान अधिकाऱ्यांच्या चाळणीत अडकले असून विविध कारणांनी एकूण सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठीचे नऊ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेला आंजी (मोठी) येथील वॉर्ड २ मधील एक अर्ज, पवनार येथील वॉर्ड २ मधील एक अर्ज, मांडवा येथील वॉर्ड २ मधील एक अर्ज, वायफड येथील वॉर्ड ४ मधील एक अर्ज, बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड ५ मधील एक अर्ज तर सावंगी (मेघे) येथील वॉर्ड १ व ५ तसेच ६ मधील प्रत्येकी एक अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे मांडगाव येथील वॉर्ड २ मधील आणि वायफड येथील वॉर्ड ४ मधील ग्रा.पं. सदस्यपदाचा अर्ज जास्त अपत्य असल्याने अवैध ठरविण्यात आले आहेत. तर सावंगी (मेघे) आणि वायफड येथील सरपंचपदासाठीच्या प्राप्त अर्जांपैकी प्रत्येकी एकअर्ज दुबार अर्ज प्राप्त झाल्याने अवैध ठरविण्यात आला आहे. एकूणच वर्धा तालुक्यात सरपंचपदासाठीचे दोन तर ग्रा.पं. सदस्यपदासाठीचे नऊ अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: After filing 75 applications decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.