प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ४ शंकराचार्यांचा नकार; म्हणाले, अर्धवट मंदिरात पूजा होत नसते!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 08:38 AM2024-01-12T08:38:32+5:302024-01-12T08:41:01+5:30

देशातील चार प्रमुख शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले

Refusal of 4 Shankaracharyas to Pranapratistha ceremony They said Puja is not done in the temple partially! | प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ४ शंकराचार्यांचा नकार; म्हणाले, अर्धवट मंदिरात पूजा होत नसते!

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ४ शंकराचार्यांचा नकार; म्हणाले, अर्धवट मंदिरात पूजा होत नसते!

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास पुरीतील गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांनी नकार दिल्यानंतर उत्तराखंडच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही नकार दिला. तसेच देशातील चार प्रमुख शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी हे मंदिर रामानंद संप्रदायाचे आहे. शैव, शाक्य व संन्याशांचे नाही, असे प्रत्त्युत्तर दिले. शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ आणि द्वारकापीठ (गुजरात)चे स्वामी सदानंद सरस्वती या दोन्ही शंकराचार्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही.

धर्मग्रंथानुसार अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत नसते. त्यामुळे या सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसल्याचे गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले. पंतप्रधानांबाबत तक्रार नाही; पण प्राणप्रतिष्ठा ही धर्मगुरूंचे काम आहे, इतरांचे नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Refusal of 4 Shankaracharyas to Pranapratistha ceremony They said Puja is not done in the temple partially!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.