तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन महिलेने केली देवीची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 14:24 IST2019-01-06T13:21:50+5:302019-01-06T14:24:05+5:30

अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत एका महिलेने तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिराच्या गर्भगृहात घुसून देवीचा चरणस्पर्श करून पूजा केली. 

The woman worshiped goddess Tulajabhavani | तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन महिलेने केली देवीची पूजा

तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन महिलेने केली देवीची पूजा

ठळक मुद्देअनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत एका महिलेने तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिराच्या गर्भगृहात घुसून देवीचा चरणस्पर्श करून पूजा केली मंजुषा मगर या महिलेचे नाव असून, त्यांनी देवीच्या गर्भगृहात जाऊन देवीची पूजा करत अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढलीया प्रकारामुळे तुळजापूरमध्ये खळबळ

तुळजापूर - अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत एका महिलेने तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिराच्या गर्भगृहात घुसून देवीचा चरणस्पर्श करून पूजा केली.  मंजुषा मगर या महिलेचे नाव असून, त्यांनी देवीच्या गर्भगृहात जाऊन देवीची पूजा करत अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढली. दरम्यान, या प्रकारामुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नसे. मात्र काही व्हीआयपी व्यक्तींना तुळजाभवानीची पूज कारण्याची परवानगी दिली जात असे. दरम्यान,  मंजुषा मगर या महिलेने देवीच्या गर्भगृहात प्रवेश मिळवून देवीचा चरणस्पर्श केला. या प्रकारामुळे महिलांना तुळजाभवानीचा चरणस्पर्श करू न देण्याची परंपरा खंडित झाली आहे. मात्र या प्रकारामुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: The woman worshiped goddess Tulajabhavani