Atrocities against 19-year-old Bhavaiyyyiyyah in Tuljapur | तुळजापूर येथे चुलत दिराकडून १९ वर्षीय भावजयीवर अत्याचार

तुळजापूर ( उस्मानाबाद ) : तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील एका १९ वर्षीय महीलेवर चुलत दिरानेच जबरी अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे़ याप्रकरणी तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करुन बुधवारी आरोपीस अटकही करण्यात आली़ 

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचा २५ वर्षीय चुलत दीर मनात वाईट भावना ठेवुन सतत पाठलाग करीत असे. तसेच मी तुझ्यावर प्रेम करतो, तु मला खुप आवडते, असे म्हणून चिठ्ठ्या पाठवायचा. मात्र याने संसारात विघ्न येईल, या भितीने हा प्रकार कोणास सांगितला नाही. त्यामुळे मागील सहा महिन्यांपूर्वी आरोपीने शेतात एकटी गाठून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. 

त्यानंतरही आरोपीने पुन्हा घरात शिरुन मोबाईलमध्ये छायाचित्रे काढली अन् पुन्हा बळजबरी अत्याचार केला हा प्रकार कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली़ दरम्यान, पीडितेने याबद्दल सासर्‍यास माहिती दिली. त्यांनी विचारणा केली असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार तुळजापूर पोलिसांनी आरोपीवर कलम ३७६ (१), ४५२, ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून, त्यास तातडीने अटकही केल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रधान यांनी सांगितले़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.