तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:17 PM2019-03-05T12:17:32+5:302019-03-05T12:23:06+5:30

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अशावेळी बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून फिरण्याचा प्लॅन केला तर आपल्याला ब्रेक मिळण्यास मदत होते.

Traveling can help you to fight depression these are five points | तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय!

तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय!

Next

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अशावेळी बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून फिरण्याचा प्लॅन केला तर आपल्याला ब्रेक मिळण्यास मदत होते. एवढचं नाही तर कामाचा सर्व ताण नाहीसा होण्यासही मदत होते. खरं तर फिरणं हा डिप्रेशनवरील उपचार नाही. परंतु हे डिप्रेशन दूर करण्यासाठी मदत करतं. एका सर्वेमधून सिद्ध झाल्यानुसार, डिप्रेशनमुळे सर्वाधिक पीडित लोकांच्या देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. भारतात जवळपास 6.5% लोकं वाढत्या तणावाच्या समस्येने त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ट्रॅव्हल करणं किंवा फिरणं डिप्रेशनपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला कस मदत करतं त्याबाबत...

1. तुम्ही नवीन लोकांना भेटता

एकटेपणाचा थेड संबंध डिप्रेशनशी आहे. जेवढं तुम्ही एकटं रहाल, तेवढचं तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता किंवा फिरण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही नवीन लोकांना भेटता. कॅब ड्रायव्हरपासून ते हॉटेल स्टाफपर्यंत तुम्हाला या प्रवासात अनेक लोकं भेटतात. या सगळ्यांशी गप्पा मारताना तुम्हाला अनेक नव्या गोष्टी समजतात. त्यांच्याशी बोलून तुम्ही डिप्रेशनपासून थोडं दूर निघून जाता. 

2. निसर्गाचा आणि डिप्रेशनचा थेट संबंध

संशोधनातून असं समोर आलं आहे की, व्यक्तीचं डिप्रेशन आणि निसर्ग यांमध्ये थेट संबंध असतो. असं मानलं जातं की, आपला मेंदू आणि मनाला निसर्ग जसं जंगल , नदी किनारी आणि डोंगरांजवळ गेल्याने शांती मिळते. जेव्हा तुम्ही निसर्गाजवळ जाता तेव्हा डिप्रेशन आपोआप दूर जाऊ लागतं. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निसर्गाजवळ जा, डिप्रेशन तेवढचं तुमच्यापासून दूर जाईल. 

3. अधिक मेहनत करा आणि खुश रहा

तुम्ही तुमच्या दररोजच्या दिनक्रमापेक्षा थोड्याशा वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. सुट्ट्यांमध्ये फिरायला जा आणि तिथे ट्रेकिंगप्रमाणे शारीरिक मेहनत करा. शारीरिक मेहनत केल्याने एंडोर्फिन हार्मोन रिलिज होतात. ज्यांचा थेट संबंध डिप्रेशनशी असतो. म्हणून फिरण्यासाठी जा आणि क्लाइबिंगपासून राफटिंगपर्यंत सर्व करा.

4. जास्तीत जास्त प्रवास करा आणि शांत झोपा

डिप्रेशनची सर्वात पहिली स्टेज ही अनिद्रेची समस्या असते. ट्रॅव्हल केल्याने तुम्ही तुमचं डेली रूटीन (मोबाइल, लॅपटॉप)पासून लांब राहता आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही पळत जाऊन बस किंवा ट्रेन पकडता. त्यानंतर संपूर्ण दिवस फिरून-फिरून थकून जाता. दिवस संपेपर्यंत तुम्ही थकून झोपण्यासाठी जाता.  त्यासाठी तुम्हाला कोणत्याही औषधांची गरज भासत नाही. 

5. जगभरातील नवीन गोष्टी जाणून घेणं

तुम्ही एखाद्या ट्रिपवर निघून गेलात तर तुम्ही तुमच्या जररोजच्या रूटीनमधून बाहेर येता. तुम्ही त्या ठिकाणी जाता, जिथे तुम्ही याआधी कधीचं गेला नव्हता. यामुळे तुम्हाला त्या जागेसंदर्भात, तेथील निवसी लोकांबाबत, खाद्यपदार्थांबाबत समजण्यास मदत होते. एखाद्या बीचवर बसून सूर्यास्त पाहण्यातही एक वेगळीचं मजा आहे. 

Web Title: Traveling can help you to fight depression these are five points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.