IRCTC Tour Package : महाकालच्या दर्शनासाठी IRCTC चे स्पेशल टूर पॅकेज, इतका येईल खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:10 PM2023-01-20T12:10:05+5:302023-01-20T12:14:43+5:30

IRCTC Tour Package : तुम्हालाही महादेवाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाऊ शकता. 

tourism irctc launched special tourist train for jyotirlinga yatra know full details | IRCTC Tour Package : महाकालच्या दर्शनासाठी IRCTC चे स्पेशल टूर पॅकेज, इतका येईल खर्च!

IRCTC Tour Package : महाकालच्या दर्शनासाठी IRCTC चे स्पेशल टूर पॅकेज, इतका येईल खर्च!

googlenewsNext

नवी दिल्ली : भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. भगवान महादेवाच्या 5 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या भारतीय रेल्वेच्या उपक्रमाद्वारे एक विशेष ट्रेन चालवली जाईल. त्यामुळे भक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहेत. तुम्हालाही महादेवाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाऊ शकता. 

कधी होईल यात्रा?
आयआरसीटीनुसार, 9 दिवसांचा प्रवास 4 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संपेल. गुलाबी शहर जयपूर येथून प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान भाविकांना 5 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच तुम्ही एलोरा लेण्यांना भेट देऊ शकता.

कुठे-कुठे जाईल ट्रेन?
स्पेशल ट्रेन त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. हे ज्योतिर्लिंग अनुक्रमे वेरावल, नाशिक, द्वारका, पुणे आणि औरंगाबाद शहरात स्थित आहे. याशिवाय, भाविक द्वारकाधिश मंदिरमध्ये भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा दर्शन घेऊ शकतील. 

काय मिळेल सुविधा?
यात्रा दोन कॅटगरीत विभागली आहे. पहिली कॅटगरी सँडर्ड आहे. या कॅटगरीचे भाडे 21390 आहे. तर, दुसरी कॅटगरी सुपीरियर आहे.  या कॅटगरीचे भाडे 24230 ठेवण्यात आले आहे. मात्र, दोन्ही कॅटगरीतील भाविकांसाठी बससेवा नॉन-एसी आहे. याबाबत अधिक माहिती देताना आयआरसीटीसीचे जॉइंट जनरल मॅनेजर म्हणाले की, यावेळी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ही यात्रा करण्यात येत आहे.

ही ट्रेन जयपूरपासून रवाना होईल. यानंतर अजमेर, भीलवाडा आणि उदयपूरहून नाशिकला पोहोचेल. याठिकाणी भाविक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करतील. दरम्यान, भाविक आयआरसीटीसीच्या वेबसाइट भेट देऊन तिकीट बुकिंग करू शकतात. याशिवाय, रेल्वेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अधिक माहिती मिळवू शकतात.    

Web Title: tourism irctc launched special tourist train for jyotirlinga yatra know full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.