फोटोग्राफी आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत 'हे' वॉटरफॉल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 07:28 PM2019-01-25T19:28:30+5:302019-01-25T19:30:22+5:30

अनेकांना वर्ल्ड टूर करण्याची फार इच्छा असते. अशातच तुम्हीही जर विदेश यात्रा करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. कदाचित विदेशात जाण्यापेक्षा तुम्हाला देशातच सुंदर ठिकाणं पाहायला मिळतील.

These famous waterfalls are best for adventure and photography | फोटोग्राफी आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत 'हे' वॉटरफॉल!

फोटोग्राफी आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत 'हे' वॉटरफॉल!

Next

अनेकांना वर्ल्ड टूर करण्याची फार इच्छा असते. अशातच तुम्हीही जर विदेश यात्रा करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. कदाचित विदेशात जाण्यापेक्षा तुम्हाला देशातच सुंदर ठिकाणं पाहायला मिळतील. अनेकदा देशातील अनेक ठिकाणांबाबत आपल्यालाच माहिती नसते. आज आम्हीही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबाबत सांगणार आहोत, जेथे जाऊन तुम्ही फोटोग्राफीसोबतच अ‍ॅडव्हेंचरही अनुभवू शकता. देशभरामध्ये असे काही सुंदर वॉटरफॉल्स आहेत जेथे जाऊन तुम्ही तुमची ट्रिप एन्जॉय करू शकता.

चित्रकूट धबधबा

जेव्हा जगभरातील बेस्ट वॉटरफॉल्सबाबत चर्चा होते, त्यावेळी सर्वात पहिलं नाव येतं ते कॅनडातील वर्ल्ड फेमस नायग्रा फॉल्सचं. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे. छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यातील इंद्रावती नदीवर असलला चित्रकूट धबधबा भारतातील नायग्रा फॉल्स म्हणून ओळखला जातो. हा 95 फूट उंचावरून कोसळतो. याचा आवाज तुम्हाला अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येऊ शकतो. पण पावसाळ्यामध्ये येथील सौंदर्य न्याहाळण्यात वेगळीच गंमत असते. 

जॉग फॉल्स 

भारतातील सर्वात सुंदर आणि अ‍ॅडव्हेंचर्स धबधब्यांपैकी एक आहे कर्नाटकातील जॉग फॉल्स. शिमोगा जिल्ह्यातील चारही बाजूंनी पसरलल्या हिरवळीमध्ये स्थित असलेला जॉग फॉल्स टूरिस्ट अट्रॅक्शन म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात उंच वॉटरफॉल्समध्ये दुसऱ्या नंबरवर येतो जॉग फॉल्स. जिथे 335 मीटर उंचावरून पाणी खाली पडतं. नेचर लव्हर्ससोबत फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांनाही ही जागा अत्यंत आवडते. जॉग फॉल्स श्रावती नदीवर आहे. 

होगेनक्कल 

जेव्हा सुदर धबधब्यांचा विषय येतो त्यावेळी कर्नाटकाचं नाव चटकन डोळ्यांसमोर येतं. हे एक असं राज्य आहे जिथे धबधब्यांची अजिबात कमतरता नाही आणि तुम्ही एकापेक्षा एक सुंदर धबधबे पाहू शकता. कावेरी नदीवर असलेल्या होगेनक्कल धबधबा 66 फूट उंच आहे. होगेनक्कल धबधब्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे दक्षिण भारत स्वतःवर गर्व करू शकतो. मान्सूनदरम्यान किंवा मान्सूननंतरही हा धबधबा अखंड कोसळत असतो. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या. 

दूध सागर

जर तुम्ही विचार करत असाल की, गोवा फक्त आपल्या बीचेससाठी ओळखलं जातं तर, तुम्ही अत्यंत चुकीचा विचार करत आहात. येथील दूध सागर धबधबा देशातच नाही तर जगभरामध्ये फेमस आहे आणि गोवा येणारे टूरिस्ट येथ नक्की जातात. एकदम सरळ उभ्या असणाऱ्या डोगंरांमध्ये जवळपास 1 हजार 17 फूट उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी दूधाप्रमाणेच दिसतं. 

Web Title: These famous waterfalls are best for adventure and photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.