आश्चर्य! जगातल्या 6 देशांमध्ये होत नाही रात्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 02:07 PM2018-05-21T14:07:28+5:302018-05-21T14:07:28+5:30

पृथ्वीवर असेही काही देश आहेत ज्या देशांमध्ये सूर्यास्त होत नाही आणि तिथे रात्रही होत नाही. चला जाणून घेऊया या काही खास देशांबद्दल...

Sun never sets in these countries | आश्चर्य! जगातल्या 6 देशांमध्ये होत नाही रात्र!

आश्चर्य! जगातल्या 6 देशांमध्ये होत नाही रात्र!

googlenewsNext

तुम्ही कधी ना कधी विचार केला असेल की, सूर्यास्त कधी झालाच नाहीतर किती मस्त ना किंवा असाही केला असेल की, सूर्योदय कधी होऊ नयेच. पण सूर्यासमोर कुणाचं काही चालत नाही. मात्र पृथ्वीवर असेही काही देश आहेत ज्या देशांमध्ये सूर्यास्त होत नाही आणि तिथे रात्रही होत नाही. चला जाणून घेऊया या काही खास देशांबद्दल...

1) नॉर्वे हा देश आर्क्टिक सर्कलच्या आत येतो. या देशाला 'लॅंड ऑफ द मिडनाइट सन' असेही म्हटले जाते. इथे रात्र होत नाही. या देशात मे ते जुलै दरम्यान साधारण 76 दिवसांपर्यंत सूर्यास्त होत नाही. त्यामुळे या देशात हा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. 

2) स्वीडन या देशात तर 100 दिवसांपर्यंत सूर्यास्त होत नाही. इथे मे ते ऑगस्ट दरम्यान सूर्यास्त होत नाही. आणि जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा अर्धी रात्र झालेली असते. पुन्हा सकाळी 4.30 वाजता सूर्योदय होतो.  

3) आईसलॅंड हा ग्रेट ब्रिटेननंतर यूरोपातील सर्वात मोठं आयलंड आहे. इथे तुम्ही रात्रीही सूर्याचा प्रकाश अनुभवू शकता. इथे 10 मे ते जुलैपर्यंत सूर्यास्त होत नाही.

4) कॅनडा जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे जो वर्षभरातील बराच काळ झाकलेला असतो. पण या देशातील उत्तर-पश्चिमी भागात उन्हाळ्याच्या दिवसात 50 दिवसांपर्यंत सर्य चमकत असतो. 

5) फिनलॅंड हा देश हजोरों तलाव आणि आयलंडने सजलेला सुंदर देश आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सूर्य लागोपाठ 73 दिवसापर्यंत आपला प्रकाश उजळवत असतो.  

6) अलास्का या देशातही मे ते जुलै दरम्यान सूर्यास्त होत नाही. इथे रात्री साधारण 12.30 वाजता सूर्यास्त होतो आणि पुन्हा 51 मिनिटांनी सूर्योदय होतो.
 

Web Title: Sun never sets in these countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.