३०० कर्मचाऱ्यांनी १६ दिवसात तयार केली मोदींच्या स्वप्नातील ट्रेन, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:12 PM2018-08-11T12:12:14+5:302018-08-11T12:24:01+5:30

स्टीम इंजिनावर चालणारी ही ट्रेन पुर्णपणे इको फ्रेन्डली आहे. पंतप्रधान १५ ऑगस्टला नवी दिल्लीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे.

PM Narendra Modi's dream train steam express | ३०० कर्मचाऱ्यांनी १६ दिवसात तयार केली मोदींच्या स्वप्नातील ट्रेन, जाणून घ्या खासियत

३०० कर्मचाऱ्यांनी १६ दिवसात तयार केली मोदींच्या स्वप्नातील ट्रेन, जाणून घ्या खासियत

Next

(Image Credit : www.jagran.com)

हरयाणा : पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न असलेली स्टीम एक्सप्रेस तयार झाली आहे. राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगलेली ही ट्रेन देशभक्तीसोबतच पर्यावरणाचाही संदेश देणार आहे. ही ट्रेन जदाधारी वर्कशॉपच्या ३०० कर्मचाऱ्यांनी केवळ १६ दिवसात तयार केली आहे.

स्टीम इंजिनावर चालणारी ही ट्रेन पुर्णपणे इको फ्रेन्डली आहे. पंतप्रधान १५ ऑगस्टला नवी दिल्लीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. ही ट्रेन दररोज फरुखनदर ते हरसरु स्टेशन दरम्यान धावणार आहे. 

विनायल रेबिंग तंत्राने रंगवली ट्रेन

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, या स्टीम एक्सप्रेसमध्ये ८ कोच असतील. प्रत्येक कोचमध्ये ९० सीट्स असतील. हे कोट विनायल रेबिंग तंत्राने तयार करण्यात आलं आहे. कोचला बाहेरुन केशरी, हिरवा आणि पांढरा रंग देण्यात आलाय. ट्रेनच्या आतल्या भागात विशेष फिनिशिंग देण्यात आलं आहे. यात प्रवाशांना मोबाइल चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 

ब्रेकसाठी व्हॅक्यूम सिस्टम बदललं

स्टीम इंजिनची ट्रेन रोखण्यासाठी व्हॅक्यूम सिस्टम काम करतं. तर इलेक्ट्रॉनिक इंजिनमध्ये एअर प्रेशर असतं. वर्कशॉपच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ब्रेकसाठी वेगळं कंट्रोल सिस्टम तयार केलं आहे. ब्रेक कंट्रोल सिस्टम दोन जागांवर देण्यात आलंय. 

२०० पेक्षा जास्त एलइडी लाईट्स

या ट्रेनमध्ये २०० पेक्षा जास्त एलइडी लाईट्स लावण्यात आले आहेत. सोबतच कमी पॉवरवर चालणारे फॅनही लावण्यात आले आहेत. पॉवर सप्लायसाठी प्रत्येक कोचमध्ये ड्राय बॅटरीचा डबल सेट लावण्यात आलाय. ड्राय बॅटरीची खासियत म्हणजे याचे फ्यूज निघत नाहीत आणि त्याची दुरुस्तीही कमी करावी लागते. 

Web Title: PM Narendra Modi's dream train steam express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.