ऑनलाईन पासपोर्ट काढण्याची सोपी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 11:51 AM2018-05-17T11:51:33+5:302018-05-17T11:52:27+5:30

आता तुम्हाला पासपोर्टसाठी पुन्हा पुन्हा पासपोर्ट ऑफिसमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. ऑनलाईनच्या माध्यामातून आता पासपोर्ट अगदी सहज काढला जातो. 

Online passport application registration status | ऑनलाईन पासपोर्ट काढण्याची सोपी पद्धत

ऑनलाईन पासपोर्ट काढण्याची सोपी पद्धत

googlenewsNext

मुंबई : जर तुम्ही आत्तापर्यत पासपोर्ट काढला नसेल आणि पासपोर्ट तयार करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. काही वर्षांपूर्वी पासपोर्ट काढणं फारच वेळखाऊ काम होतं. पण आता ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. आता तुम्हाला पासपोर्टसाठी पुन्हा पुन्हा पासपोर्ट ऑफिसमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. ऑनलाईनच्या माध्यामातून आता पासपोर्ट अगदी सहज काढला जातो. 

कसे कराल अर्ज?

पासपोर्ट काढण्यासाठी सर्वातआधी http://www.passportindia.gov.in या वेबसाईटला भेट दया. 

या वेबसाईटवक तुमचं अकाऊंट तयार करा आणि फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये माहिती देताना तुम्हाला त्याच शहरातील पासपोर्ट ऑफिसला सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण माहिती चेक करा. 

फॉर्म योग्यरितीने भरल्यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करा. याने या वेबसाईटवर तुमचं अकाऊंट तयार होईल. आता ऑफिशिअल वेबसाईटवर ई-मेल टाकून लॉग इन करा. 

लॉग इन केल्यानंतरही एक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. तो भरल्यानंतर अपॉयमेन्ट फिक्स करा. 

त्यानंतर तुम्हाला काही ठराविक फि ऑनलाईन पेमेंट पर्यायाच्या माध्यामातून जमा करावी लागेल. त्यांनतर तुम्हाला अपॉयमेंटची तारीख आणि वेळ निवडावा लागेल. 

पेमेंट आणि अपॉयमेंट फिक्स केल्यानंतर एक पेज ओपन होईल, ज्यात पासपोर्टसंबंधी माहिती असेल. 

अपॉयमेंटच्या दिवशी या पेजची प्रिंटआउट सोबत घेऊन जा आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये सर्व कागदपत्रे सबमिट करा. 

कागदपत्रे सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी पोलीस व्हेरिफिकेशल होईल आणि त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला पासपोर्ट मिळेल.

Web Title: Online passport application registration status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.