लग्नासोबतच सिनेमाच्या शूटींगसाठीही लोकप्रिय आहे हे जगमंदिर आयलॅंड पॅलेस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 12:07 PM2019-02-28T12:07:06+5:302019-02-28T12:10:39+5:30

उदयपूर हे देशातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. कपल्समध्ये हे शहर फारच लोकप्रिय आहे.

Jagmandir Island palace of Udaipur a popular wedding destination and tourist attraction | लग्नासोबतच सिनेमाच्या शूटींगसाठीही लोकप्रिय आहे हे जगमंदिर आयलॅंड पॅलेस!

लग्नासोबतच सिनेमाच्या शूटींगसाठीही लोकप्रिय आहे हे जगमंदिर आयलॅंड पॅलेस!

Next

उदयपूर हे देशातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. कपल्समध्ये हे शहर फारच लोकप्रिय आहे. पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी किंवा हनीमूनसाठी उदयपूर नेहमी टॉप लिस्टमध्ये असतं. आज आम्ही तुम्हाला उदयपूरमधील जगमंदिर आयलॅंड पॅलेसबाबत सांगणार आहोत.

हे एक परफेक्ट ड्रिम डेस्टीनेशन मानलं जातं. पिचोला लेकवर स्थित या ठिकाणाला 'लेक गार्डन पॅलेस' असंही म्हटलं जातं. या पॅलेसच्या निर्माणाचं श्रेय १७व्या शतकातील मेवाडचे सिसोदीया राजपूतच्या तीन महाराजांना जातं. त्यात महाराणा अमर सिंह, महाराणा करण सिंह आणि महाराणा जगत सिंह यांचा समावेश आहे. 

गुल महाल आणि म्युझिअम

(Image Credit : Booking.com)

शाही परिवार या पॅलेसचा वापर उन्हाळ्यात करत असत. पिचोला लेकच्या मधोमध असलेल्या लेक गार्डनला बघून असं वाटतं की, जसा पाण्यात मार्बलचा दगड तरंगत आहे. जगमंदिराच्या आजूबाजूला आणखीही काही बघण्यासारखी काही ठिकाणे आहेत. जसे की, गुल महाल आणि म्युझिअम. गुल महालाचं निर्माण १९५१ मध्ये महाराणा अमर सिंह यांच्या काळात करण्यात आलं होतं. त्यासोबतच इथे एक छोटं म्युझिअमही आहे. इथे ऐतिहासिक आणि जगमंदिर आयलॅंड पॅलेसशी संबंधित वस्तू ठेवल्या आहेत. उदयपूरमध्ये नेहमीच बॉलिवूड सिनेमांच्या शूटिंग होत असतात. इथेही अनेक सिनेमांची शूटिंग करण्यात आली आहे. 

पिचोला लेकचाही घ्या आनंद

(Image Credit : Viator.com)

जर तुम्ही जगमंदिर आयलॅंड पॅलेसला जाण्याचा प्लॅन करतच असाल तर ज्यावर हा पॅलेस स्थित आहे, त्या पिचोला लेकची सैर तर करायलाच हवी. पिचोला लेकच्या आजूबाजूला बघितले तर तुम्हाला स्वप्नाहून सुंदर असा नजारा बघायला मिळेल. या लेकमध्ये चार द्वीप आहे, जग मंदिर, जग निवास, मोहन मंदिर आणि अर्सी व्हिला. ताज्या पाण्याच्या या लेकमध्ये तुम्ही तसे तर कोणत्याही वेळी बोटींग करू शकता, पण सूर्यास्तावेळी एक वेगळाच आनंद मिळू शकतो. सिटी पॅलेसपासून सुरू होणारी ही सैर जवळपास एक तासांची असते. 

Web Title: Jagmandir Island palace of Udaipur a popular wedding destination and tourist attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.