IRCTC चे शानदार टूर पॅकेज! तिरुपती, कन्याकुमारीसह 'या' स्थळांना भेट देऊ शकता कमी बजेटमध्ये, 9 दिवसांचा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 01:30 PM2023-01-18T13:30:11+5:302023-01-18T13:36:14+5:30

IRCTC Tour Package : या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देण्याची संधी मिळेल.

irctc tour package for rameshwarm madurai kanyakumari tirupati start from 24 january | IRCTC चे शानदार टूर पॅकेज! तिरुपती, कन्याकुमारीसह 'या' स्थळांना भेट देऊ शकता कमी बजेटमध्ये, 9 दिवसांचा दौरा

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! तिरुपती, कन्याकुमारीसह 'या' स्थळांना भेट देऊ शकता कमी बजेटमध्ये, 9 दिवसांचा दौरा

Next

नवी दिल्ली :  येत्या काही दिवसांत दक्षिण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याचा तुमचा प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी स्वस्तात फिरण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, आयआरसीटीसीने (IRCTC) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) आणि 'देखो अपना देश' मोहिमेअंतर्गत स्वस्त टूर पॅकेज (IRCTC Tour Package 2023) आणले आहे.

या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देण्याची संधी मिळेल. टूर पॅकेजचा खर्च 13,900 रुपयांपासून सुरू होतो. यामधील सुविधाबद्दल बोलायचे तर टूर पॅकेजमध्ये खाण्या-पिण्याव्यतिरिक्त तुम्हाला फिरण्यासाठी बसही दिली जाईल.या टूर पॅकेजची सुरुवात 24 जानेवारी 2023 रोजी गुजरातमधील राजकोट येथून होईल. हा संपूर्ण प्रवास 8 रात्री 9 दिवसांचा असणार आहे. 

या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज नाही. आयआरसीटीसी सर्व व्यवस्था करणार आहे. हा प्रवास स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या विशेष ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी राजकोट, साबरमती, वडोदरा, कल्याण आणि पुणे स्थानकांवरून बोर्डिंग/डिबोर्डिंग शकतील.

टूर पॅकेजसाठी शुल्क किती?
इकॉनॉमी टूर पॅकेजसाठी दर बदलतील. पॅकेज 13,900 रुपये प्रति व्यक्तीपासून सुरू होईल. जर तुम्ही बजेट कॅटगरीमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला 13,900 रुपये मोजावे लागतील. जर स्टँडर्ड कॅटगरी पॅकेज घेतल्यास प्रति व्यक्ती 15,300 रुपये शुल्क द्यावे लागेल. कंफर्ट कॅटगरीसाठी प्रति व्यक्ती 23800 रुपये द्यावे लागतील.

असे करु शकता बुकिंग
या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइट irctctourism.com वर जाऊन ऑनलाइन बुकिंग करता येईल. याशिवाय, आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.

या मिळतील सुविधा
साउथ इंडिया डिवाइन एक्‍स राजकोट (South India Divine Ex. Rajkot (WZSD10)), असे या पॅकेजचे नाव आहे. या टूरमध्ये तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराई येथे नेले जाईल. 24 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात फक्त आयआरसीटीसी प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देईल. प्रवासी स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करू शकतात. प्रवासी राजकोट, साबरमती, वडोदरा, कल्याण आणि पुणे स्थानकांवरून त्यांचा प्रवास सुरू आणि संपवू शकतात.

Web Title: irctc tour package for rameshwarm madurai kanyakumari tirupati start from 24 january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.