भारतात 'या' बीचवर घ्या सर्फिंगचा रोमांचक अनुभव, पैसा वसूल एन्जॉयमेन्टसाठी व्हा तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:57 PM2019-04-26T12:57:16+5:302019-04-26T13:09:57+5:30

उन्हाळा आला की, अनेकजण थंड ठिकाणांवर अधिक फिरायला जातात. तर काही लोक समुद्राच्या पाण्यात मजामस्ती करताना दिसतात.

Best and perfect destination in India for surfing | भारतात 'या' बीचवर घ्या सर्फिंगचा रोमांचक अनुभव, पैसा वसूल एन्जॉयमेन्टसाठी व्हा तयार!

भारतात 'या' बीचवर घ्या सर्फिंगचा रोमांचक अनुभव, पैसा वसूल एन्जॉयमेन्टसाठी व्हा तयार!

Next

उन्हाळा आला की, अनेकजण थंड ठिकाणांवर अधिक फिरायला जातात. तर काही लोक समुद्राच्या पाण्यात मजामस्ती करताना दिसतात. सर्फिंगच्या अनोख्या अनुभवासाठी भारतात काही खास ठिकाणे आहेत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही अॅडव्हेंचरचा आनंद घेऊ शकता.  

भारतात सर्फिंगची क्रेझ रीव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग आणि बंजी-जम्पिंग एवढीच आहे. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांमध्येही याची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. पण भारतातील लोकही हळूहळू हा रोमांचक अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे भारतातील अशाच काही खास ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही सर्फिंग एन्जॉय करु शकता. 

पारादीप, ओडिशा

(Image Credit : Travel Ka Baap)

येथील समुद्री लाटांमध्ये १ किलोमीटर अंतरापर्यंत तुम्ही आरामात सर्फिंग करु शकता. कारण येथील लाटा शांत असतात. जर तुम्हाला ५ ते ६ फूट उंच लाटांमध्ये सर्फिंग करायचं असेल तर जगन्नाथपुरीला जाऊ शकता. 

कोवलम, केरळ

(Image Credit : MakeMyTrip)

हा बीट केरळ्या सर्वात लोकप्रिय बीचपैकी एक आहे. इथे सर्फिंगची नुकतीच सुरुवात करणाऱ्यांची जास्त संख्या बघायला मिळते. येथील रॉकी बीच थोडा रिस्कीही मानला जातो. पण जर तुम्हाल सर्फिंग चांगलं येत असेल तर तुम्ही बिनधास्त होऊन एन्जॉय करु शकता. 

गोकर्ण, कर्नाटक

(Image Credit : lbb.in)

सर्वांना वाटत असतं की, गोव्यातील बीच सर्वात सुंदर आहेत. पण कर्नाटकातील गोकर्ण बीच गोव्यातील बीचपेक्षी कमी सुंदर नाहीत. या बीचवर दिसणारे सुंदर नारळांचं झाडे या बीचचं सौंदर्य दुप्पट करतात. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा सर्फिंग अॅडव्हेंचर ट्राय करण्याचा विचार करत असाल तर इथे येऊ शकता. येथील सांत लाटांमध्ये तुम्ही चांगलं एन्जॉय करु शकता. 

वरकला, केरळ

वरकला बीचवर तुम्ही सर्फिंग शिकणाऱ्यांपासून ते प्रोफेशनल्सना मस्ती करताना बघू शकता. येथील लाटा फार घातक नसतात आणि त्यामुळे तुम्ही नवखे असाल तरी इथे सर्फिंग ट्राय करु शकता. 

मानापद पॉइंट, तामिळनाडू

(Image Credit : Bugyal)

हे ठिकाण कर्नाटकातील ऑफबिट डेस्टिनेशनमध्ये आहे. हे ठिकाण भारतातील बेस्ट सर्फिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. पावसाळ्यात इथे सर्फिंग करणं घातक ठरु शकतं. पण इतर सीजनमध्ये तुम्ही एन्जॉय करु शकता. 

माहे, केरळ 

उत्तेरत माहेपासून ते दक्षिणमध्ये तालाकलाटूरपर्यंत पसरलेल्या केरळच्या या सुंदर जागेवर येऊन तुम्ही सर्फिंगचा पुरेपुर आनंद घेऊ शकता. तसे तर केरळमध्ये जास्त बीचवर हा थरारक अनुभव घेऊ शकता. पण माहेतील शांत वातावरण पर्यटकांना अधिक भावतो. 

कापू बीच, कर्नाटक

(Image Credit : TripAdvisor)

कर्नाटकातील कापू बीचवर येऊन तुम्ही सर्फिंगचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर येथील सर्फिंग क्लब्समधून सर्फिंगच्या बारीकसारीक गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यामुळे इथे येणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरु शकतं. 

Web Title: Best and perfect destination in India for surfing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.