बादशाह अकबरने पुत्र सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:06 PM2019-02-06T16:06:40+5:302019-02-06T16:11:35+5:30

मुघल बादशाह अकबरने मुलगा सलीम याला ज्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं तो किल्ला अलवरमधील बाल किल्ला आहे.

Bal kila also called alwar fort in Alwar tourist attraction | बादशाह अकबरने पुत्र सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत!

बादशाह अकबरने पुत्र सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत!

googlenewsNext

मुघल बादशाह अकबरने मुलगा सलीम याला ज्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं तो किल्ला अलवरमधील बाल किल्ला आहे. हा किल्ला अलवर या नावानेही ओळखला जातो. अरावलीच्या डोंगरामध्ये असलेल्या या किल्ल्याची भिंत संपूर्ण डोंगरावर पसरलेली आहे. १ हजार फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचं निर्माण हसन खान मेवाती यांनी केलं होती. हा किल्ला अलवरमधील सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. 

किल्ल्याची बनावट

हा किल्ला त्याच्या बनावटीसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. ५ किलोमीटर लांब आणि १.५ किलोमीटर रूंग बाल किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ५ दरवाजे आहेत. या किल्ल्यात जलमहल, निकुंभ महल, सलीम सागर, सूरज कुंड आणि काही मंदिरांचा पडलेला पाहता येऊ शकतो. किल्ल्याच्या आत जवळपास ३४० मीटर उंचीवर १५ मोठे आणि ५१ छोटे टॉवर लावण्यात आले आहेत. किल्ल्यात ८ मोठे बुर्ज आणि तोफांसाठी ४४६ छिद्रे आहेत. तसेच या किल्ल्यात राम मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे. 

बाल किल्ल्याचा इतिहास

१५५१ मध्ये हसन खान द्वारे तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याची शान आजही तशीच कायम आहे. या किल्ल्यावर मुघलांसोबतच मराठा आणि जाट शासकांनीही शासन केलं होतं. शेवटी १७७५ मध्ये कच्छवाहा राजपूत प्रताप सिंह यांना किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला होता. 

किल्ल्यात फिरण्याची वेळ

किल्ल्याच्या सुंदरतेचा आनंद तुम्ही सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत घेऊ शकता. तसा तर अलवरमध्ये फिरण्यासाठी सर्वात चांगलं वातावरण ऑक्टोबर ते मार्च महिन्यात असतो. पावसाळ्यातही इथे फिरण्याची एक वेगळी मजा असते. 

कसे पोहोचाल?

अलवरला पोहोचण्यासाठी नवी दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्वात जवळ आहे. जयपूर ते अलवर अंतर सामान्यपणे १६२ किमी आहे. जयपूर आणि दिल्ली सोबतच उत्तर भारत आणि राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरातून अलवरसाठी रेल्वेही आहेत. 

Web Title: Bal kila also called alwar fort in Alwar tourist attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.