हायप्रोफाइल लग्नामुळे चर्चेत आलं 'औली हिलस्टेशन', जाणून घ्या 5 खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 03:24 PM2019-06-10T15:24:37+5:302019-06-10T15:25:09+5:30

उत्तराखंडमधील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणारं शहर म्हणजे, औली. सध्या या शहराच्या सर्वत्र चर्चा होत असून परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आठवडाभरासाठी बुक करण्यात आली आहेत.

Auli 5 best place to visit which is ready for most expensive marriage | हायप्रोफाइल लग्नामुळे चर्चेत आलं 'औली हिलस्टेशन', जाणून घ्या 5 खास गोष्टी

हायप्रोफाइल लग्नामुळे चर्चेत आलं 'औली हिलस्टेशन', जाणून घ्या 5 खास गोष्टी

Next

उत्तराखंडमधील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणारं शहर म्हणजे, औली. सध्या या शहराच्या सर्वत्र चर्चा होत असून परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आठवडाभरासाठी बुक करण्यात आली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एनआरआय भारतीय उद्योजकाच्या मुलांची हाय-प्रोफाईल लग्न भारतातील उत्तराखंड येथील शानदार हिल स्टेशनजवळ होणार आहे. या लग्नासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. 18 ते 22 जूनपर्यंत हे शाही विवाहसोहळे पार पडणार आहेत. जाणून घेऊया हिल्स स्टेशन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या औली शहराबाबत... तुम्हीही जर उकाड्याला कंटाळला असाल आणि फिरायला जाण्यासाठी एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल तर औली बेस्ट ऑप्शन आहे. येथे फिरण्यासाठी काही बेस्ट डेस्टिनेशन्सही आहेत. 

औली रोपवे

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या औलीमध्ये फिरण्यासाठी अनेक खास ठिकाणं आहेत. आशियातील सर्वात लांब ट्रॉलीची सफर औली येथे तुम्हाला करता येणार आहे. ट्रॉलीमध्ये बसून बर्फाने आच्छादलेल्या पर्वतरांगांना जवळून पाहाताना येथील सौंदर्य तुम्हाला नक्कीच भूरळ घालेल. 

(Image Credit : Thrillophilia)

औली आर्टिफिशिअल लेक 

औलीचं सौंदर्य नक्कीच तुम्हाला भूरळ घालेल, पण येथे आल्यानंतर येथील कृत्रिम तलाव पाहायला विसरू नका. हा भारतातील सर्वात प्राचीन तलावांपैकी एक आहे. हा तलाव मानवाने तयार केलेल्या तलावांपैकी सर्वात मोठा तलाव असल्याचं मानलं जातं. 

(Image Credit : eUttaranchal)

गोरसों बुग्याल

तसं पाहायला गेलं तर बर्फाने औली बर्फाने आच्छादलेल्या पर्वतरांगांसाठी ओळखंलं जातं. परंतु जर तुम्हाला शेत आणि जंगलांमध्ये फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर जवळपास 4 किलोमीटरवर असलेल्या गोरसों बुग्याल या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

क्वानी बुग्याल

गोरसों बुग्याल पासून जवळपास 12 किलोमीटर पुढे क्वानी बुग्याल नावाचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा सुंदर आहे. 

छत्रकुंड

पर्यटकांना येथे असलेला छत्रकुंड नावाचा तलावही आकर्षित करत असतो. ज्याचं चमकदार पाणी गोड असतं. येथील तापमान सामान्य तापमानापेक्षा फार कमी असतं. त्यामुळे येथे फिरण्यासाठी जाण्या अगोदर व्यवस्थित थंडीचे कपडे घेऊन जा.  

Web Title: Auli 5 best place to visit which is ready for most expensive marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.