औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
शहरातील दंगलग्रस्त भाग असलेल्या शहागंज, राजाबाजार, नवाबपुरा, चेलीपुरा, मोतीकारंजा, गांधीनगर आणि चंपाचौक परिसरातील दंगलीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी (दि.१४) पूर्वपदावर आले. ...
या जाळपोळीचे नेतृत्व करणारा नेता पोलीस अधिकाऱ्याशी ‘हात’ मिळवतो अन् पोलीस जिन्सीकडे निघून जातात. यानंतर मागे जाळपोळ केली जाते. हस्तांदोलन करणारा अधिकारी आणि नेता कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...
शहराचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गुलमंडीवरील ऐतिहासिक अजिंठा सिल्क शोरूम शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जाळण्यात आले. ...
नवाबपुरा रोडवर शेख रऊफ यांनी ‘अपना’हे इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा उधारीवर मालही आणला. त्यांचे दुकान आणि गोदाम शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाले. ...
दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. ...