पाण्यासाठी श्रमजीवीचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:49 AM2019-02-19T04:49:49+5:302019-02-19T04:50:04+5:30

ठामपा अधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द : घोडबंदर येथील गावपाडे, आदिवासी वस्त्यांत भीषण टंचाई

women drive long march for water | पाण्यासाठी श्रमजीवीचा हंडा मोर्चा

पाण्यासाठी श्रमजीवीचा हंडा मोर्चा

Next

ठाणे : घोडबंदर भागाचा झपाट्याने विकास होत असताना येथील गावपाड्यांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. या भागातील गावपाडे आणि आदिवासी वस्त्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याने श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिला रिकामे हंडे-मडके घेऊन सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी महापालिका अधिकाºयांना सुपूर्द केले.

ठाणे महापालिकेची निवड स्मार्ट सिटीच्या यादीत झाली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेपासून ठाण्यात अस्तित्वात असलेले मूळ ठाणेकर नागरिक अद्यापही पाण्यासारख्या मूलभूत सोयींपासून वंचित आहेत. ठाण्यातील समतानगर, पातलीपाडा, इंद्रापाडा, डोंगरीपाडा, बोरिवडे, भार्इंदरपाडा, वळकरीपाडा, ओवळा-टकरडा, पानखंडा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोकणीपाडा आदी आदिवासीपाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, येथील कुटुंबांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या पाणीटंचाईच्या निषेधार्थ सोमवारी शेकडो आदिवासी महिला डोईवर हंडे-कळशा आणि रिकामे मडके घेऊन माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पर्यायी पाणीव्यवस्थेसह वैयक्तिक नळजोडणी करून देण्याची आणि शौचालय, स्मशानभूमी, वनहक्क दावे आणि इतर मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याबाबत पालिका अधिकाºयांना मोर्चेकºयांनी निवेदन दिले. आदिवासीपाड्यांतील पाच ते सात ठिकाणांवर पाणीटंचाई असल्याचे मोर्चेकºयांचे म्हणणे आहे. समतानगर, पातलीपाडा येथे पाणी आहे. मात्र, काहीजण पंप लावून पाणी खेचत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन टंचाई निर्माण होत आहे.

पाण्यासाठी दाही दिशा
याचे सर्वेक्षण करण्याबरोबरच वितरणव्यवस्थेसह नवीन पाण्याची टाकी आणि पंपदेखील बसवले जाईल. पानखंडा भागात नियमित टँकरची सुविधा पुरवली जाते. शिवाय, कूपनलिकाही आहेत. तरीही, काही समस्या असतील तर, त्या सोडवल्या जातील, असे आश्वासन महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिले. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, पाण्यासाठी त्यांना दाही दिशा फिरावे लागते आहे.

Web Title: women drive long march for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.