तुमचा खासदार करतो काय?, त्यांची कामे आम्हाला का विचारता? - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:15 PM2018-12-15T18:15:44+5:302018-12-15T18:16:04+5:30

राज ठाकरे यांना रेल्वे प्रवासी महासंघाने केला असता ते म्हणाले की, तुमचा खासदार करतो काय? जी कामे त्यांनी करायची ती आम्हाला का विचारता? निवडून देतांना ते आणि समस्यांसाठी आम्ही हे सूत्र जमणार नाही. निवडणुकांच्या वेळी मतदारांनी विचार करायला हवा असेही ते म्हणाले.

What does your MPs do, why do their works ask us? - Raj Thackeray | तुमचा खासदार करतो काय?, त्यांची कामे आम्हाला का विचारता? - राज ठाकरे

तुमचा खासदार करतो काय?, त्यांची कामे आम्हाला का विचारता? - राज ठाकरे

Next

डोंबिवली : रेल्वे प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्या कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, त्या बद्दल मनसेने पुन्हा एकदा आवाज उठवावा असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रेल्वे प्रवासी महासंघाने केला असता ते म्हणाले की, तुमचा खासदार करतो काय? जी कामे त्यांनी करायची ती आम्हाला का विचारता? निवडून देतांना ते आणि समस्यांसाठी आम्ही हे सूत्र जमणार नाही. निवडणुकांच्या वेळी मतदारांनी विचार करायला हवा असेही ते म्हणाले.
शनिवारी डोंबिवलीत शनिवारी युवा पदाधिकारी सागर जेधे, नगरसेवक मंदार हळबे यांच्या नुतन कार्यालयाच्या शुभारंभासाठी ते आले असतांना त्यांनी उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या पदाधिका-यांसमवेत चर्चा केली. २०१२ पासून आतापर्यंत महिला विशेष लोकल नाही, गर्दीच्या वेळेत विशेष लोकल सुविधा नाही. त्यामुळे प्रवासी हैराण असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हे गंभीर आहे. त्यावर प्रवासी संघटनेने कटाक्ष टाकला असता ते म्हणाले की, समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी मनसे पक्ष प्रयत्न करतच आहे. फेरीवाला प्रश्न हा दादरपासून डोंबिवलीपर्यंत बहुतांशी रेल्वे स्थानक परिसरात तरी कमी झाला असून यासह अनेक समस्यांना मार्गी लावण्यासाठी ठाकरेंनी पुढे यावे, सातत्याने बैठका करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते, परंतू ते पूर्ण झाले नाही, असे म्हंटल्यावर ठाकरे यांनी प्रवासी संघटनांनी यावे निश्चितच चर्चा केली जाईल असे स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गतवर्षी ५ आॅक्टोबर रोजी प्रवासी संघटनांच्या शिष्ठ मंडळासोबत मध्य, पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसमवेत चर्चा केली होती. तशी भेट पुन्हा एकदा होणे आवश्यक आहे असा आग्रह केल्यावर मात्र ते म्हणाले की, जी काम खासदाराने करायची ती त्यांनीच केली पाहिजेत. ५/६व्या रेल्वे मार्गासंदर्भात सातत्याने डेडलाईन पुढे ढकलली जात आहे हे कितपत योग्य आहे? यावर ते म्हणाले की, निवडून ज्यांना दिलेत त्यांना हे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. तसेच लवकरच प्रवासी संघटनांसमवेत चर्चा करून समस्या मांडण्यात येतील.

दरम्यान जेधे यांच्या डिएनसी महाविद्यालयानजीकच्या सुनिल नगर येथील, आणि मंदार हळबेंच्या राजाजीपथ येथील स्वामी नारायण मंदिरासमोरील इमारतीमधील पक्षाच्या नुतन कार्यालयाच्या शुभारंभ राज ठाकरे यांनी केला. सकाळी ते मनसे नेते राजू पाटील यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी पाटील यांच्या घरामध्ये असलेल्या श्वानांसमवेत वेळ घालवला. तसेच पाटील यांच्याशी काही चर्चा केली. त्यावेळी मनसे नेते राजू पाटील, अभिजीत पानसे, मनसेचे नगरसेवक, महिला, पुरूष, युवा कार्यकर्ते आदींसह नागरिक उपस्थित होते.

 मनसे नेते राजू पाटील यांच्या शांतीरत्न कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. पण त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष मिळून वेगळे सूत्र, समीकरण मतदारांसमोर येणार का याची सर्वत्र चर्चा सुरू होती.
 

Web Title: What does your MPs do, why do their works ask us? - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.