बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 05:38 PM2018-02-24T17:38:43+5:302018-02-24T17:38:43+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरासर औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती बारवी धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

Water supply to Barvi dam up to July 15 | बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

googlenewsNext

डोंबिवली- कल्याण डोंबिवली महापालिका परिसरासर औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती बारवी धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 
डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने काल शुक्रवारी बारवी धरणाला भेट देण्यात आली. यावेळी ही माहिती दिली. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बारावी धरणात पाणीसाठा वाढणार आहे. त्यासाठी धरणाला 11 वक्र  पध्दतीचे दरवाजे बसविण्यात आले आहे. तोंडली, मोहघर, काचकोळी, सुकाळवाडी, कोळेवडखळ, मानिवली ही गावे आणि जांभूळवाडी, महरकवाडी, देवपाडा, खामघर,बुरडवाडी या पाडय़ातील सुमारे 765 कुटुंबियांचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास अधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केला. ज्या ठिकाणी  वक्र दरवाजे बसवण्यात आले आहेत. त्या 80 मी लांबीचा बांध दगडाने बांधण्यात आला आहे. धरणाचे तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम सांडव्यार्पयत येऊन थांबले असून 68.60 मीटरवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. नॉन ओव्हर फ्लो विभागाची उंची वाढवण्याचे काम 65 मीटर्पयत पूर्ण झाले आहे. सध्या हे वक्र दरवाजे उघडे करून ठेवण्यात आले आहेत. 

औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणावर पाच मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत केंद्र उभारण्यास खाजगी तत्वावर परवानगी दिली असून वीज निर्मितीपासून महामंडळाची सुमारे 6 कोटी रूपयांची बचत होणार आहे. संपूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर म्हणजे 340.48 द ल घ मी इतका साठा झाल्यानंतर वीजनिर्मिती सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. अजून पुर्नवसनाचे काम शिल्लक असल्याने यंदा ही धरणात पाणीसाठा 68.80 मीटर इतका होणार आहे. सध्या पंधरा दिवसातून एकदा पाणी कपात केली जाते. यामुळे 15 जुलैर्पयत आणखी पाणी कपात करण्याची गरज नाही. मात्र याचा निर्णय लघू पाटबंधारे विभाग घेते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 

Web Title: Water supply to Barvi dam up to July 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.