भिवंडीतील चार पाड्यांमध्ये पाणी टंचाई; उसगावचा बंधारा उशाला, पण कोरड घशाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 01:21 PM2019-05-05T13:21:22+5:302019-05-05T14:23:30+5:30

भिवंडी तालूक्यातील गणेशपूरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या उसगावबंघारा, उसगाव, कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या आदिवासी कातकरीपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

water shortage in ganeshpuri bhiwandi | भिवंडीतील चार पाड्यांमध्ये पाणी टंचाई; उसगावचा बंधारा उशाला, पण कोरड घशाला...

भिवंडीतील चार पाड्यांमध्ये पाणी टंचाई; उसगावचा बंधारा उशाला, पण कोरड घशाला...

Next
ठळक मुद्देभिवंडी तालूक्यातील गणेशपूरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या उसगावबंघारा, उसगाव, कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या आदिवासी कातकरीपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपूरवठा विभागाध्यक्षा अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याने या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे.ठाणे जिल्हा परिषद भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अंर्तगत येणाऱ्या गणेशपूरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कवाडपाडा बोरवेल आहे.

रोहिदास पाटील

अनगाव - भिवंडी तालूक्यातील गणेशपूरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या उसगावबंघारा, उसगाव, कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या आदिवासी कातकरीपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपूरवठा विभागाध्यक्षा अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याने या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र उसगांव येथे तानसा, वैतरणा धरणाच्या धर्तीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. येथील पाणी वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा, विरार शहराला तसेच उसगांव या गावाला पाईपलाईनने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या कातकरी वाडीसह या टंचाईग्रस्त पाड्यांना पाणी मिळत नसल्याने धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषद भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अंर्तगत येणाऱ्या गणेशपूरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कवाडपाडा बोरवेल आहे. पाण्याची टाकीही बसविण्यात आली आहे. शासन नियमानूसार दीडशे फूट बोअरवेल मारल्याने तिला पाणी लागलं नाही तर उसगांव बंधारा येथील कातकरी वाडीतील बोअरवेल आहे तिला पाणी नाही याच बंधाऱ्यामधून उसगाव गावात नळ पाईपलाईन टाकून उसगावात पाणी पूरवठा केला जात आहे. मात्र त्याच्या एक किमी अंतरावर असलेल्या कातकरीवाडीमधील नागरिक पाणी टंचाईचा सामना करीत आहेत.

भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यामध्ये नागरी सुविधांची वाणवा आहे. विशेष म्हणजे गणेशपूरी येथे स्वामी नित्यानंद महाराजांच समाधी मंदिर आहे. या ठिकाणी देशातील परदेशातील भक्त दर्शनाकरीता येतात अशा नित्यानंद महाराजाच्या पावनभूमीत आज ही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ही धक्कादायक गोष्ट आहे.

गणेशपूरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्राला शासनाने पर्यटनाचा दर्जा दिला आहे शासनाने हे क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. मात्र येथील सुविधा सोडविल्या नाहीत त्यामुळे पर्यटन क्षेत्र हे कागदोपत्री आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते याला काय म्हणायचे असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पाणी पूरवठा विभागाचे अधिकारी राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांच्याकडे पाणी टंचाईसंबधी लेखी निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने गेल्या वर्षी व यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिलेले आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त गाव पाड्याची नावे समाविष्ट आहेत. सहा महिने उलटून गेल्यावरही त्यावर पाणी पुरवठा विभागाने का उपाय योजना केल्या नाहीत असा प्रश्न संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते जयेश पाटील यानी उपस्थित केला आहे.

तीर्थक्षेत्र आसलेल्या गणेशपुरी गावालगत असणाऱ्या पाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने तालूका व जिल्हा प्रशासन काय करताय की पाण्याकरीता एखादा जीव गमावल्यावर ते येथील पाणी टंचाई दूर करणार आहेत असा सवाल संजय कामडी यांनी केला आहे.  या पाड्यांवर बोरवेल आहेत त्यांना पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलावरून पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. तर येथील पाड्यांना टॅंकरने पाणीपूरवठा सुरू करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 
 

Web Title: water shortage in ganeshpuri bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.