आठवडाभरात दोन वेगवेगळ्या वेळी पाणी बंद, अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:24 AM2019-02-05T03:24:12+5:302019-02-05T03:24:31+5:30

अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Water closure at two different points during the week, Shiv Sena's Front in Ambernath | आठवडाभरात दोन वेगवेगळ्या वेळी पाणी बंद, अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोर्चा

आठवडाभरात दोन वेगवेगळ्या वेळी पाणी बंद, अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोर्चा

Next

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जीवन प्राधिकरणाविरोधात अंबरनाथ शिवसेनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सरसकट दोन दिवस बंद न घेता २४-२४ तासांचे दोन बंद आठवडाभरात घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेची ही मागणी लागलीच मान्य करण्यात आली. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी हजर राहावे, अशी मोर्चेकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ते उपस्थित न राहिल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे (प्रभारी) यांच्या अखत्यारीत अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, अधिकाºयांच्या चुकीचा भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. वितरणव्यवस्थेतील त्रुटी, पाण्याची गळती, दूषित पाणीपुरवठा या मुख्य समस्यांवर अनेकदा चर्चा करूनही त्यावर कोणतेच ठोस निर्णय अधिकाºयांमार्फत घेण्यात आलेले नाहीत. शहरात पाणीसमस्या त्रासदायक असतानाही अधिकारी नियोजनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा शांतताभंग करेल, या भीतीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालयाला बंदोबस्त दिला होता. मोर्चेकºयांच्या वतीने अरविंद वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, चंद्रकांत बोराडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाºयांसोबत चर्चा करण्यात येणार होती. मात्र, प्राधिकरणाच्या मनीषा पलांडे या अंबरनाथला न आल्याने वाळेकर यांनी संताप व्यक्त केला. पलांडे यांना पूर्वकल्पना देऊनही अधिकारी येत नसतील, तर पाणीप्रश्नावर ते गंभीर नाहीत, असेच दिसत असल्याचा आरोप वाळेकर यांनी केला. जोपर्यंत ते येत नाही, तोवर मोर्चा हलणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली. अखेर, सहा. पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी तडजोड करून चर्चा करण्यास भाग पाडले.

शासनाच्या आदेशाप्रमाणे ३७ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, वितरणव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तीन दिवस पाणी बंद आहे. प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तसेच शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासही मंजुरी देण्यात आली. या दोन मुख्य मागण्यांवर प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यावर हा मोर्चा माघारी निघाला.
 

Web Title: Water closure at two different points during the week, Shiv Sena's Front in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.