ओल्या कचऱ्यावरील पालिकेचा खत प्रकल्प सुरू, ५५० टन क्षमतेचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:50 AM2019-05-09T00:50:28+5:302019-05-09T00:50:45+5:30

भार्इंदर महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे ओल्या कचºयापासून खत बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १६ मे पासून जे नागरिक वा गृहनिर्माण संस्था ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांचा कचरा उचलणार नसल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

Waste drilling project started in the project, 550 tonne capacity project | ओल्या कचऱ्यावरील पालिकेचा खत प्रकल्प सुरू, ५५० टन क्षमतेचा प्रकल्प

ओल्या कचऱ्यावरील पालिकेचा खत प्रकल्प सुरू, ५५० टन क्षमतेचा प्रकल्प

Next

भार्इंदर : मीरा - भार्इंदर महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे ओल्या कचºयापासून खत बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १६ मे पासून जे नागरिक वा गृहनिर्माण संस्था ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांचा कचरा उचलणार नसल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. घनकचरा अधिनियमानुसार नागरिकांवर कारवाई करण्यासह नळजोडण्या खंडित करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. काही भागातील कचरा उचलणे बंद केले असता नगरसेवक आडकाठी आणत असल्याने त्यांचीही नोंद पालिका ठेवणार आहे.

राज्य शासनाने उत्तनच्या धावगी डोंगरावर घनकचरा प्रकल्पासाठी तब्बल साडे एकतीस हेक्टर जमीन पालिकेला फुकट दिली आहे. गेली १२ वर्षे पालिकेने येथे बेकायदा कचरा डंपिंग चालवल्याने स्थानिकांमध्ये असंतोष आहे. कचºयाचे डोंगर निर्माण झाले आहेत, तसेच पाणी प्रदूषित होऊन शेती नापीक झाली आहे. दुर्गंधी, आग लागून होणारा धूर यांमुळे आरोग्याचा प्रश्न बिकट असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे प्रकल्पाच्या जागेत राजरोस झालेल्या अतिक्रमणाकडे पालिकेने डोळेझाक चालवली आहे.

हरित लवाद तसेच न्यायालयाकडून महापालिकेला तंबी मिळाल्यानंतर आयआयटीच्या मार्गदर्शनाखाली कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कागदावर तो ३५० टनाचा असला तरी त्याची क्षमता मात्र ५५० टनाची असल्याचे पालिका अधिकारी सांगतात. सध्या रोज सुमारे ६० - ७० टन सुक्या कचºयावर प्रक्रिया करून बॉयलर, सिमेंट प्लांटसाठी लागणाºया आरडीएफ नावाच्या इंधनाच्या विटा तयार केल्या जात आहेत. कचºयाचे पूर्ण वर्गीकरण झाले तर आणखी ७० टन सुक्या कचºयावर प्रक्रिया होणार आहे.

ओल्या कचºयापासून खत बनवण्याचा प्रकल्प सुध्दा या ठिकाणी सुरू करण्यात आला असला तरी वर्गीकरण करून कचरा येत नसल्याने सध्या नाममात्र ओला कचराच खत बनवण्यासाठी वापरला जात आहे. ओल्या कचºयावर प्रक्रिया १० दिवसांपासून सुरू केली आहे. रोजच्या सुमारे १० - १५ गाड्या ओला कचरा हा खत प्रकल्पासाठी तयार केलेल्या वाफ्यात टाकला जातोय. आयुक्त बालाजी खतगावकर आणि कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता किरण राठोड, स्वच्छता निरीक्षक प्रकाश पवार आदी प्रकल्प सुरू करण्यापासून काम पहात आहेत.

शहरातील सर्वच्या सर्व ५५० टन कचºयावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करायची असल्यास ओला आणि सुक्या कचºयाचे वर्गीकरण अत्यावश्यक असल्याने पालिकेने पुन्हा कारवाईचा इशारा दिला आहे.

लोकप्रतिनिधींचा खोडा नको

पालिका आतापर्यंत ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्यांवर कारवाईच्या पोकळ वल्गनाच करत आली आहे. त्यातही कचरा उचलला नाही तर लोकप्रतिनिधींकडून दबाव येतो आणि शेवटी कचरा उचलावा लागतो. नागरिकांची जबाबदारी असताना लोकप्रतिनिधी देखील त्यात खोडा घालत असल्याने आतापर्यंत कचरा वर्गीकरण बारगळले आहे. पण प्रकल्पासाठी कचरा वेगळा असणे आवश्यक असल्याने आता नगरसेवकांना देखील पालिकेने सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारवाईदरम्यान आडकाठी आणणाºया नगरसेवकांची माहिती थेट पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे दिली जाणार आहे.

५५० टन क्षमतेचा प्रकल्प असून सुक्या कचºयावर प्रक्रिया सुरू आहे. ओल्या कचºयाचा प्रकल्प सुरू केला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची जबाबदारी घनकचरा अधिनियमानुसार कचरा निर्माण करणाºया नागरिकांची आहे. गेली ३ ते ४ वर्ष पालिका लोकांना सातत्याने आवाहन करते आहे. जनजागृती, गृहनिर्माण संस्थांच्या बैठका, नोटीसा इतकेच काय तर मोफत डबेसुध्दा पालिकेने दिले आहेत. तरीही कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने १६ मे पासून वेगळा न केलेला कचरा उचलला जाणार नाही. त्यांच्या नळ जोडण्या खंडित करू तसेच अधिनियमानुसार कारवाई करू. - डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मनपा

Web Title: Waste drilling project started in the project, 550 tonne capacity project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.