शुक्रतारा मंद वारा...! ला झाली ५५ वर्षे! मराठी भावगीतातील पहिल्या युगल गीताचे गारुड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:30 AM2017-10-08T03:30:27+5:302017-10-08T03:31:04+5:30

मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त्याचे गारूड आजही कायम आहे.

Venus slow wind ...! Has been 55 years! The first duet of Marathi bhgeetta is known as the Geeta Garood | शुक्रतारा मंद वारा...! ला झाली ५५ वर्षे! मराठी भावगीतातील पहिल्या युगल गीताचे गारुड कायम

शुक्रतारा मंद वारा...! ला झाली ५५ वर्षे! मराठी भावगीतातील पहिल्या युगल गीताचे गारुड कायम

googlenewsNext

- नंदकुमार टेणी 

ठाणे : मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त्याचे गारूड आजही कायम आहे. या गीताच्या निर्मितीची कथाही मोठी रंजक आहे.
ही गोष्ट १९६२ ची, आकाशवाणी मुंबईवर प्रख्यात संगीतकार यशवंत देव हे भाव सरगम हा कार्यक्रम सादर करायचे. त्याची निर्मितीही तेच करायचे. एक दिवस ते आणि खळे काका संध्याकाळी आकाशवाणीत गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात देव यांनी सहज इंदौर केंद्र लावले. त्यावर एक गायक गात होता. त्यावर खळे म्हणाले, अरे यशवंत, असा आवाज आपण कधी ऐकलाच नाही रे. हा गायक कोण आहे? त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. त्यांनी इंदौर केंद्राला फोन लावला. तेव्हा ए. आर. दाते नावाचा तो नवा गायक असून तो ए क्लास आर्टीस्ट असून सध्या मुंबईत आहे. त्यांचा पत्ता कळवितो, ही माहिती इंदौर केंद्राने दिली.
पत्ता मिळाल्यावर खळे आणि देव यांनी आकाशवाणीसाठी भावगीत गाण्याची पाच-सहा कॉन्ट्रॅक्ट पाठविली, पण उत्तर आले नाही. शेवटी एक दिवस खळे हे जाऊन धडकले. पाहता तो रसिकाग्रणी रामू भैय्या दाते साक्षात समोर उभे. खळे सुद्धा मध्य प्रदेशचे. खळेंनी येण्याचे कारण सांगितले. कॉन्ट्रॅक्ट पाठविले तो रामू भैय्याचा मुलगा असल्याचे कळाले. त्याला रामू भैय्यांनी बोलाविले. तुला पाच सहा कॉन्ट्रॅक्ट मुंबई आकाशवाणीने पाठविली तरी उत्तर का दिले नाही? असे विचारले. मी आजवर कधीही मराठी गीत गायलो नाही. हिंदी गीते आणि गझल गाण्याचाच मला अनुभव आहे. मध्य प्रदेशी ढंगाचे मराठी कोणाला आवडत नाही. पुण्या-मुंबईचे लोक त्याची खिल्ली उडवितात, मग मी मराठी भावगीत गाण्याचे धाडस कसे करू?, असे उत्तर त्याने दिले.
त्यावर खळे म्हणाले, तुमच्यासाठी माझ्याकडे एक गीत आहे. ते तुम्हीच गायले पाहिजे, अशी माझी इच्छा नव्हे तर जिद्द आहे. हे युगल गीत आहे. ते तुम्ही गायले नाही तर मी ते तसेच ठेवेन. कारण ते तुम्हाला डोळ््यासमोर ठेऊनच पाडगावकरांनी लिहिले आहे. मग रामू भैय्या दातेंनी समजाविल्यावर हा तरूण गायक तयार झाला. सुधा मल्होत्रा व त्याच्या आवाजात हे गीत मुंबई आकाशवाणीत रेकॉर्ड झाले. त्याचे रेकॉर्डिंग यशवंत देव यांनी निर्माता म्हणून स्वत: केले होते. उद्घोषणा मी तयार करते आहे, असे निवेदिका कमालीनी विजयकर यांनी सांगितले.
विजयकर म्हणाल्या, सुधा मल्होत्रा हे नाव बरोबर आहे पण गायकाचे नाव ए. आर. दाते, असे आहे. आपण नाव आणि आडनाव असे सांगतो. त्यामुळे ए. आर. दाते असे नाव सांगता येणार नाही. खळे आणि देव यांना गायकाचे नाव माहिती नव्हते. अंदाजानेच ते म्हणाले, त्याला घरात अरू अरू म्हणतात. म्हणजे बहुदा ते अरूण असावे. गाणे प्रसारीत होताना उद्घोषणा ऐकल्यावर दाते उडाले. त्यांना वाटले दुसराच कोणी तरी अरूण दाते आहे. गाणे ऐकल्यावर आपलाच आवाज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी फोन करून देव आणि खळेंना विचारल्यावर पुढच्या वेळी दुरूस्ती करू, असे सांगितले. मात्र शुक्रताराने एवढी प्रचंड लोकप्रियता मिळविली की, दातेंना नाव अरविंद असले तरी अरूणच ठेवावे लागले.
सुधा मल्होत्रा गंमतीने म्हणतात की, हे गाणे इतके लोकप्रिय होईल हे मला माहित असते तर मी पाडगावकर, देव व खळे यांना ते युगल गीत न ठेवता एकल गीत करायला लावले असते.

- गीताच्या रेकॉर्डिंगवेळी पाडगावकर, खळे, देव यांच्याबरोबरच प्रख्यात गायक केशवराव भोळे उपस्थित होते. त्यांनीही दातेंना शाबासकी दिली. गीताच्या लोकप्रियतेमुळे अवघ्या तीन महिन्यांतच त्याची एच.एम.व्ही.ने ध्वनिमुद्रिका काढली, ते वर्ष १९६३ होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Web Title: Venus slow wind ...! Has been 55 years! The first duet of Marathi bhgeetta is known as the Geeta Garood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत