तणावाखालील पप्पांना समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 02:19 AM2018-06-17T02:19:02+5:302018-06-17T02:19:02+5:30

स्पर्धात्मक जीवनशैली, पर्यावरणाचा -हास, नैतिक अवमूल्यन, सुखांचा न संपणारा हव्यास, व्यायामाची कमतरता, अयोग्य आहारविहार अशा विविध कारणांमुळे घराघरांतील पप्पा, बाबा, डॅडी मानसिक ताणतणावाखाली आहेत.

Understand the stresses below the stress | तणावाखालील पप्पांना समजून घ्या

तणावाखालील पप्पांना समजून घ्या

Next

मीरा रोड : स्पर्धात्मक जीवनशैली, पर्यावरणाचा -हास, नैतिक अवमूल्यन, सुखांचा न संपणारा हव्यास, व्यायामाची कमतरता, अयोग्य आहारविहार अशा विविध कारणांमुळे घराघरांतील पप्पा, बाबा, डॅडी मानसिक ताणतणावाखाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ‘लो इम्पल्स कंट्रोल’ची समस्या वाढली असून एखादी गोष्ट घडून येण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याची त्यांची सहनशक्तीच नष्ट झाली आहे. जवळपास प्रत्येक घरातील कर्त्या पुरुषांची ही अवस्था असल्याचे मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी व्यक्त केले. ‘जागतिक फादर्स डे’च्या निमित्ताने आपल्या पप्पांच्या मनात डोकावून पाहा व त्यांच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्याकरिता प्रयत्न करा, असेही माटे म्हणाले.
डॉ. माटे म्हणाले की, आमचे पप्पा वरचेवर चिडतात, म्हणजेच ते मानसिक तणावाखाली आहेत. हा तणाव सभोवताली बदलत असलेल्या जीवनशैलीशी निगडित असून तो तणाव घालवण्यासाठी कुटुंबातील सर्वांनीच त्यांना साथ देण्याची गरज आहे. १७ जून हा जागतिक फादर्स डे असून बदललेल्या जीवनशैलीमुळे आजच्या फादर्सना म्हणजेच वडिलांना काय त्रास होत आहे, याची चर्चा घडवून आणणे फार महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य हा व्यापक विषय आहे. मात्र, ताण आणि नैराश्य हे मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चेत असणारे मुद्दे आहेत. जीवनातील हा ताण हळूहळू वाढत असल्याने फॅमिली डॉक्टरप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला फॅमिली मनोविकारतज्ज्ञ असण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, नोकरीतील टार्गेट्स, पैशांचे व्यवस्थापन ही घरातील कर्त्या पुरु षांचा मानसिक ताणतणाव वाढवणारी कारणे आहेत. कुटुंबामध्ये वाढलेल्या मानसिक ताणतणावाचे नियंत्रण करणे फार गरजेचे झाले आहे, असे डॉ. माटे म्हणाले.
पूर्वी घरामध्ये रेडिओ हे एकमेव उपकरण होते. परंतु, आज परिस्थिती बदलली असून घरामध्ये कमीतकमी १५ ते २० उपकरणे गरजेची झाली असून यात टीव्ही, फ्रीज, महागडे मोबाइल, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, कॉम्प्युटर ,मायक्र ोवेव्ह, एसी आदी अनेक उपकरणांची गरज निर्माण झाली आहे. या साऱ्यांची पूर्तता करताना घरातील कमावत्या माणसाला म्हणजेच पप्पांना अक्षरश: घाम फुटलाय. ताण आला तरी तो वाटून घ्यायला जवळची माणसं कमी झाली आहेत. माणूस समाजात जेवढा मिसळतो, तेवढी त्याच्यात दुसºयांना सहन करण्याची, समजून घेण्याची वृत्ती वाढते. पण, हे होत नाहीय. प्रत्येकजण गर्दीत असूनही एकाकी जीवन जगतोय. त्यामुळे वाढलेले ताणतणाव असह्य झाल्यावर टोकाचे पाऊल उचलतो. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज डॉ. माटे यांनी व्यक्त केली.
शारीरिक व मानसिक आरोग्य योग्य राखण्यासाठी आचार, विचार, विहार, आहार, यांना आजही तितकेच महत्त्व आहे. मानसिक ताणतणावाची परिस्थिती जेव्हा शरीरात निर्माण होते, तेव्हा अ‍ॅड्रीलीन ग्रंथी स्राव उत्पन्न करतात. या स्रावामुळे शरीरात बरेच बदल घडतात. या स्रावामुळे सर्वप्रथम हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो, स्नायूंचा रक्तपुरवठा वाढतो व पचनसंस्थेकडील रक्तपुरवठा कमी होतो. खाल्लेले अन्न शरीर व्यवस्थित पचवू शकत नाही. त्यामुळे पचनसंस्थेचे वेगवेगळे विकार उद्भवतात. याची सुरु वात अपचनापासून होते, असे आहारतज्ज्ञ फातिमा रनधनपूरवाला म्हणाल्या.
वारंवार अ‍ॅसिडिटी, पोटफुगी होणे हे वरकरणी किरकोळ वाटले, तरी त्यामागे मुख्य कारण मानसिक आजार हेच असू शकते. मुंबईसारख्या शहरांची लोकसंख्या खूपच जास्त आहे. बºयाच नागरिकांची घरे ही शहराच्या दुसºया टोकाला असल्याने तेथे पोहोचण्यासाठी त्यांना बरीच यातायात करावी लागते.
>मुंबईमध्ये कार्यालय आणि घर यांच्यामध्ये अंतर खूप असल्यामुळे खाण्याच्या व झोपण्याच्या वेळा सातत्याने बदलतात.परिणामी पोटाच्या विविध समस्यांमध्ये वाढ होते, असे मत रनधनपूरवाला यांनी यावेळी व्यक्त केले.
>तणावाला वेळीच आळा घातला नाही तर अल्सर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (ज्यामध्ये पोट मुरडूनमुरडून दुखते), अ‍ॅड्रीलीनच्या स्रावामुळे रक्तातील साखरेचे व चरबीचे प्रमाण वाढणे व मधुमेहासारखे विकार उत्पन्न होणे, चरबी वाढून लठ्ठपणा, हृदयविकार, पक्षाघात अशा आजारांचे प्रमाण वाढते.त्यांना बरीच यातायात करावी लागते. त्यामुळे खाण्याच्या व झोपण्याच्या वेळा बदलतात. पोटाच्या समस्यांमध्ये वाढ होते, असे मत रनधनपूरवाला यांनी व्यक्त केले. ताण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली वाहतूकव्यवस्था.

Web Title: Understand the stresses below the stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.