उल्हासनगरमध्ये पुतळे बेवारस,पालिकेचे दुर्लक्ष : स्वच्छतेचा पत्ताच नाही, अवहेलना थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:58 AM2017-11-15T01:58:44+5:302017-11-15T01:58:53+5:30

महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे.

Ulhasnagar statues are unavoidable, ignorance of the corporation: no proof of cleanliness, demand for stop defying | उल्हासनगरमध्ये पुतळे बेवारस,पालिकेचे दुर्लक्ष : स्वच्छतेचा पत्ताच नाही, अवहेलना थांबवण्याची मागणी

उल्हासनगरमध्ये पुतळे बेवारस,पालिकेचे दुर्लक्ष : स्वच्छतेचा पत्ताच नाही, अवहेलना थांबवण्याची मागणी

Next

उल्हासनगर : महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे. याविरोधात माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी आवाज उठवून पुतळयाची अवहेलना थांबवण्याची विनंती केली आहे.
महापालिकेने शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते, उघानांमध्ये २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. त्यांची निगा व पावित्र्य राखण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे. आठवडयातून एकदा पुतळयाची पाण्याने साफसफाई करून रोज फुलांचा हार अर्पण करण्याचे काम यापूर्वी बांधकाम विभागाकडून करण्यात येत होते. ते आजही केले जात असल्याचा दावा विभागाने केला असला तरी, त्यांचा खोटारडेपणा मालवणकर यांनी उघड केला आहे. मालवणकर यांनी काही दिवसांपूर्वी हिराघाट येथील सरदार वल्लभभाई पटेल व जयप्रकाश नारायण यांचा पुतळा धुळीने माखलेला असल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकून एकच खळबळ उडवून दिली होती.
मालवणकर यांनी टाकलेल्या फोटोनंतर महापालिकेने शहरातील पुतळयांची स्वच्छता करून हार अर्पण केले. मात्र त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीचा प्रत्यय आला. पुतळे पुन्हा धुळीने माखले असून हार उन्हामुळे पूर्णत: वाळल्याचे फोटो मालवणकर यांनी सोशल मीडियावर टाकले. ७०० कोटीचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेला राष्ट्रपुरूष, संत व सुधारकांच्या पुतळयाची निगा व पावित्र्य राखता येत नसल्याचे पुन्हा उघड केले. पुतळ््यांची महापालिकेकडून होणारी अवहेलना थांबत नसल्याने, सामान्य नागरिकांकडून पालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त होत आहे.
महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, वीर सावरकर, जिजामाता व बालशिवाजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहाद्दूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, रवींद्रनाथ टागोर, संत कंवाराम, स्वामी शांतीप्रकाश, शहीद हेमू कलानी, स्वामी दयानंद स्वरस्वती आदी २२ पुतळे बसवले आहेत. कंत्राटदारामार्फत हे काम करत असून त्यावर लाखोंचा खर्च दाखवला जातो.

Web Title: Ulhasnagar statues are unavoidable, ignorance of the corporation: no proof of cleanliness, demand for stop defying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.