चक्क नातेवाईकच निघाला चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 04:03 AM2017-10-30T04:03:02+5:302017-10-30T04:03:17+5:30

हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत (२८, रा. किंजल, दिघा, नवी मुंबई)

There was a relation with a relative | चक्क नातेवाईकच निघाला चोरटा

चक्क नातेवाईकच निघाला चोरटा

Next

ठाणे : हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत (२८, रा. किंजल, दिघा, नवी मुंबई) याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोकडसहित ५८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
कळव्याच्या न्यू शिवाजीनगर येथील विनायक चाळीत राहणारे रूपसिंग राठोड (३६) यांच्या घरात २५ आॅक्टोबरला सकाळी ७.३० ते २६ आॅक्टोबरला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली. यामध्ये ६८ हजारांची रोकड, अर्धा तोळा सोन्याचे मंगळसूत्र, तसेच काही दागिने असा ८२ हजारांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी राठोड यांनी २७ आॅक्टोबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासमवेत काही नातेवाईकही होते. त्यात त्यांच्या बहिणीचे पती कमलेंदर (मेहुणे) यांचाही समावेश होता. या चोरीचा तपास लवकर लावावा, असा आग्रहदेखील त्यांनी पोलिसांकडे धरला होता.
पोलिसांनी राठोड यांच्या घराची पाहणी केली. तेव्हा या घराची चावी कोणाकडे असते, आणखी कोणकोण नातेवाईक तिथे आले? या सर्व बाबींची चौकशी त्यांनी केली. तेव्हा संशयाची सुई कमलेंदर यांच्याकडेच आली. तरीही, आपण त्या गावचे नसल्याचा आव आणणाºया या मेहुण्याची पोलिसांनी कसून चौकशी केली.
याच चौकशीत त्याने या
चोरीची अखेर कबुली दिली. हार्डवेअरच्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात उधारी झाली होती. ही उधारी चुकविण्यासाठी देणेदारांनी तगादा लावला होता. मग जितक्या पैशांची गरज होती, तेवढीच रोकड आणि दागिन्यांची चोरी केली, असा दावाही त्याने पोलिसांकडे केला.

Web Title: There was a relation with a relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.