...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:23 AM2018-11-13T05:23:17+5:302018-11-13T05:23:33+5:30

दररोज २६६ एमएलडी पाणीचोरी : लघुपाटबंधारे विभागाने दिली तंबी

... then the water closure of KDMC, MIDC | ...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

googlenewsNext

सुरेश लोखंडे 

ठाणे : मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षाएमआयडीसी सुमारे २०० दशलक्ष लीटर (एमएलडी) व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलून चोरी करत असल्याचे पाहणीअंती उघड झाले. ही पाणीचोरी तत्काळ थांबवा, अन्यथा पाणीपुरवठाच बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाने दिल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.

धरणसाठ्यामध्ये यंदा सुमारे २२ टक्के पाण्याची तूट आहे. ही भरून काढण्यासाठी २२ आॅक्टोबरपासून महापालिका, नगरपालिकांसह एमजेपी, टेमघर आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे सर्वानुमते मान्यही झाले. त्यानुसार, आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवला जात आहे. परंतु, एमआयडीसी त्यांच्या ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी पाणी रोज उचलत असल्याचे पाहणीत उघड झाले. याप्रमाणेच केडीएमसीदेखील त्यांच्या २३४ एमएमलडी मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी उचलत असल्याची बाब निदर्शनास आली.
या प्रकारे चोरून जादा पाणी उचलत राहिल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होईल. त्यांच्या या पाणीचोरीचा फटका जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बसून जादा पाणीकपात सोसावी लागेल. यामुळे ठाण्यासह उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या नागरिकांवर अन्याय होईल. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एमआयडीसी व केडीएमसीला त्यांची मनमानी पाणीचोरी तत्काळ थांबवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने जारी केले. अन्यथा उल्हास नदी, बारवी धरण आदी ठिकाणांहून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्याची तंबी खास बैठक घेऊन देण्यात आली आहे. यामुळे आता त्यांच्याकडून जादा पाण्याची चोरी होणार नसल्याची अपेक्षा पाटबंधारे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दिवाळीचा जादा पाणीपुरवठा बंद

दिवाळी संपलेली असल्यामुळे आधी लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आता पूर्ववत करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा एमआयडीसी शुक्रवारी बंद ठेवणार असून अन्य दिवशी ५८३ एमएलडी मंजूर कोटा उचलणे भाग पडणार आहे.

याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीचा २३४ एमएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर, स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. यामुळे भिवंडी, मीरा-भार्इंदर व घोडबंदरसह ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी तो बंद ठेवला जाईल. अन्य दिवशी त्यांना ९० एमएलडी पाणी उचलावे लागणार आहे.

 

Web Title: ... then the water closure of KDMC, MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.