ठाण्यातील अभिनय कट्ट्याचा शोमॅन संकेत देशपांडेला कट्टयावर वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:28 PM2018-08-13T15:28:04+5:302018-08-13T15:30:08+5:30

यावेळचा अभिनय कट्टा समर्पित केला तो संकेत देशपांडे या हरहुन्नरी कलाकाराला. यावेळी त्याला कलाकारांनी आदरांजली वाहिली. 

Thanhin's acting cartoon showman, Deshpande, on Kattyaavar Vahli Daryanjali | ठाण्यातील अभिनय कट्ट्याचा शोमॅन संकेत देशपांडेला कट्टयावर वाहिली आदरांजली

ठाण्यातील अभिनय कट्ट्याचा शोमॅन संकेत देशपांडेला कट्टयावर वाहिली आदरांजली

Next
ठळक मुद्देसंकेत देशपांडेला आदरांजली वाहणारा कट्टा म्हणजे या रविवारचा कट्टाअभिनय कट्टयावर संकेतने 7 वर्षांपूर्वी केले पदार्पण संपूर्ण अभिनय कट्टा कुटुंबियांना मोठा धक्का

ठाणे : अभिनय कट्टयावर आजपर्यंत शेकडो कलाकारांनी हजारो भूमिका रंगवल्या व त्यातील सर्वात जास्त व्यक्तिरेखा साकारणारा अभ्यासू, प्रामाणिक, अतिशय नम्र,प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या संकेत देशपांडेला आदरांजली वाहणारा कट्टा म्हणजे या रविवारचा कट्टा.

    हातात माईक घेऊन सदैव प्रत्येक रसिक प्रेक्षकांचं स्वागत करणारा संकेत कधीही हातात माईक न घेण्यासाठी निघून गेला. अभिनय कट्ट्यासाठी काळा दिवस होता 10  ऑगस्ट 2018. गेल्या दीड महिन्याआधी संकेतला हृदयविकाराचा झटका आला होता परंतु त्याची अँजिओप्लास्टी होऊन तो आता पुन्हा एकदा पूर्ववत काम करण्याच्या तयारीत होता. त्याला डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्ट्रेस टेस्ट करण्यासाठी संकेत 10 ऑगस्ट रोजी सकाळी बाबांना घेऊन अतिशय उत्साहात बॉम्बे हॉस्पिटलला निघाला,तिथे टेस्ट करून बाहेर पडल्यानंतर काही क्षणातच संकेतची ज्योत मालवली. ही बातमी ऐकताच अभिनय कट्टा व संकेतच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. बातमी पसरताच कट्ट्याच्या शेकडो कलाकारांनी कट्टयाकडे धाव घेतली व  कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांच्यासोबत सर्वच कलाकार संकेतच्या घरी पोहोचले पण ते सत्य कुणालाही स्वीकारता येत नव्हतं,प्रत्येक कलाकाराच्या अश्रूंचा बांध फुटला. संकेतला शेवटचा निरोप देणं उपस्थित प्रत्येकाला असह्य वेदना  देणारं होतं. संकेतच्या घरातल्यांप्रमाणेच किरण नाकतींची अवस्था झाली. खऱ्या अर्थाने अभिनय कट्ट्याचा तारा निखळला. संकेतने शालेय शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कुल, ठाण्याच्या व्ही पी एम मधून  डिप्लोमा, तसेच इंजिनियरिंग भारती विद्यापीठ खारघर येथून केलं. तसंच यावर्षी व्ही पी एममधून अगदी मागच्याच आठवड्यात एल.एल.बी पूर्ण केलं. उच्चशिक्षित असलेल्या संकेतला एक उत्कृष्ट अभिनेता, लेखक, निवेदक ही ओळख मिळवून दिली ती अभिनय कट्ट्याने. अभिनय कट्टयावर संकेतने 7 वर्षांपूर्वी पदार्पण केले. कट्ट्याच्या माध्यमातून एकपात्री, द्विपात्री, एकांकिका ,अभिवाचन, नाटक, मालिका ,जाहिरात, चित्रपट अशा  सर्वच माध्यमातून अतिशय वाखाणण्याजोगे काम केले. अभिनेता म्हणून त्याने अनेक भूमिका अजरामर केल्या. या रविवारचा कट्टा असा होईल असा विचार सुद्धा कधी कुणी केला नसेल. शोकसभेत अनेक कलाकारांनी संकेतसोबतच्या आपल्या आठवणी व्यक्त केल्या. संकेतचे मोठे बंधू सचिन देशपांडे यांनी संकेतचे लहानपणापासून भाषेवर कसे प्रभुत्व होते हे वेगवेगळ्या अनुभवांतून मांडले. संकेतने आजवर केलेल्या कामाचे चित्रफितीचे सादरीकरण बघुन उपस्थित सर्वच शोकाकुल अभिनय कट्टा परिवार अश्रू आवरू शकला नाही. संकेत सदैव लक्षात राहावा म्हणून अभिनय कट्ट्याच्या वाचनालयाला संकेत देशपांडे वाचनालय तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांपंर्यत संकेतच काम पोहोचावे म्हणून संकेत देशपांडे स्मृती चषक नावाने राज्यस्तरीय द्विपात्रीस्पर्धेचे आयोजन दरवर्षी करणार असल्याचे संचालक किरण नाकती यांनी जाहीर केले.

कलाकारांसाठी आपलं आजपर्यंतच आयुष्य पणाला लावणाऱ्या कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांचा हुकमी एक्का, त्यांचा सर्वात लाडका , केवळ कलाकार म्हणून नाही आपला मुलगाच मानणाऱ्या संकेतच जाणं म्हणजे वैयक्तिक किरण नाकती यांना व संपूर्ण अभिनय कट्टा कुटुंबियांना मोठा धक्का आहे. अभिनय कट्ट्यावरील प्रत्येक संस्कार  म्हणजे संकेत , कट्ट्याला आदर्श मानणारा आणि कट्ट्याचा  आदर्श असणारा माझा संकेत कोणताही संकेत न देता गेला, संकेत म्हणजेच अभिनय कट्ट्याची शिस्त होती, माझ्यानंतर मी जर कुणाच्या हातात माईक दिला असेल तर तो एकमेव संकेत देशपांडे. मग ते कट्ट्या चे निवेदन असो किंवा दिवाळी पहाट, 96वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन, अशा अनेक कार्यक्रमांची जबाबदारी मी त्याच्यावर द्ययचो आणि तो ती यशस्वीपणे पार पाडायचा. असा माझा संकेत होणे नाही परंतु संकेत आम्हा प्रत्येक कट्टेकऱ्यांमध्ये कायम राहील व त्याने केलेलं काम आम्ही सदैव लोकांपर्यंत पोहोचवत राहू. तसेच त्याच्या पश्चात त्याचे आई , वडील , भाऊ , वहिनी ,पुतणे यांना मानसिक आधार देणे ही सुद्धा आमची जबाबदारी असल्याचे किरण नाकती यांनी सांगितले

Web Title: Thanhin's acting cartoon showman, Deshpande, on Kattyaavar Vahli Daryanjali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.