ठाणेकर प्रवाशांवर २० टक्के तिकीट दरवाढीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:21 AM2019-02-15T02:21:21+5:302019-02-15T02:21:35+5:30

सुखकर प्रवासाची हमी देण्याऐवजी जुन्याच योजनांचा मुलामा देत ठाणे परिवहनसेवेने यंदा पुन्हा ठाणेकरांवर तिकीट दरवाढ लादण्याची तयारी केली आहे. ठाणे परिवहनसेवेने समितीसमोर गुरुवारी २०१९-२० चा ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.

Thanekar passenger fares at 20 percent | ठाणेकर प्रवाशांवर २० टक्के तिकीट दरवाढीची कु-हाड

ठाणेकर प्रवाशांवर २० टक्के तिकीट दरवाढीची कु-हाड

Next

ठाणे : सुखकर प्रवासाची हमी देण्याऐवजी जुन्याच योजनांचा मुलामा देत ठाणे परिवहनसेवेने यंदा पुन्हा ठाणेकरांवर तिकीट दरवाढ लादण्याची तयारी केली आहे. ठाणे परिवहनसेवेने समितीसमोर गुरुवारी २०१९-२० चा ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. डिझेलचे वारंवार वाढत जाणारे दर, सीएनजीचे वाढते दर, परिवहनसेवेच्या संचालनात असलेल्या जुन्या बस, जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीत झालेली वाढ आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असल्याने सध्याच्या प्रवासी भाड्यात २० टक्के भाडेवाढ प्रस्तावित करण्यात येत असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानुसार, पहिल्या टप्प्यासाठी दोन रुपये आणि शेवटच्या टप्प्यासाठी पाच रुपये दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी परिवहन समिती याबाबत काय निर्णय घेणार, याकडे समस्त ठाणेकरांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाणे परिवहनसेवेमार्फत गुरुवारी परिवहन समितीसमोर २०१८-१९ चा २५१.०३ कोटींचा आणि सन २०१९-२० चा ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून ठाणेकरांवर सहाव्यांदा तिकीट दरवाढीची कुºहाड कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असल्या, तरी प्रत्यक्षात रस्त्यावर ८० च्या आसपास बसेस धावत आहेत. जीसीसीच्या माध्यमातून १९० आणि २५ एसी बस अशा एकूण २९५ बस धावत आहेत. परिवहनमधून अडीच लाखांच्या आसपास प्रवासी दररोज प्रवास करत असून परिवहनचे रोजचे उत्पन्न हे ३० लाखांच्या घरात आहे. ठाणेकरांना सुखकर प्रवासाची हमी देण्यात परिवहन प्रशासन सपशेल अपयशी झालेले आहे. असे असताना सहाव्यांदा परिवहनने २० टक्के तिकीट दरवाढ सुचवली आहे.
तिकीट दरवाढीसाठी चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजी दरात झालेली लक्षणीय वाढ, परिवहनसेवेच्या संचालनात असलेल्या जुन्या बसमुळे डिझेलचा होणारा जास्त वापर, तसेच शासनाने कार्यान्वित केलेल्या जीएसटीमुळे वाहनांच्या सुट्या भागांच्या किमतीत झालेली दरवाढ आदी कारणे देण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजे, सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे कारणही परिवहनने भाडेवाढीसाठी पुढे केले आहे.

सहाव्यांदा होणार भाडेवाढ
यापूर्वी १ जानेवारी २००३, ११ आॅगस्ट २००७, १६ जून २०११ आणि मार्च २०१३ मध्ये भाडेवाढ झाली होती. त्यानंतर, २०१५ मध्ये पाचव्यांदा भाडेवाढ करण्यात आली होती. आता २०१९ मध्ये सहाव्यांदा भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली.

प्रवासी उत्पन्नातून १६३.७४ कोटी
विविध कारणांमुळे परिवहनसेवेच्या दैनंदिन महसुली तुटीमध्ये वाढ होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी इतर उत्पन्नाच्या स्रोतांबरोबर भाडेवाढही प्रस्तावित करण्यात येत असल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. या आर्थिक वर्षात जुलै २०१९ नंतर परिवहनच्या तिकीटदरात २० टक्के भाडेवाढ याप्रमाणे दैनंदिन ३.४० लाख यानुसार संभाव्य भाडेवाढीतून अपेक्षित रक्कम नऊ कोटी ३५ लाख अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवासी उत्पन्नापोटी १६३.७४ कोटींची जमा अपेक्षित धरण्यात आली आहे.

Web Title: Thanekar passenger fares at 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे