दडपशाहीसह अपमानाविरोधात जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे ठाण्यात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 07:00 PM2017-12-19T19:00:44+5:302017-12-19T19:04:09+5:30

दिवाळीपूर्वी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देणाऱ्यां  शिक्षण विभागाने अद्यापही कार्यवाही केली नाही. या दडपशाहीसह अपमानाविरोधात ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले.

Thane protest movement of junior college district teachers against oppression with repression | दडपशाहीसह अपमानाविरोधात जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे ठाण्यात धरणे आंदोलन

दडपशाहीसह अपमानाविरोधात जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे ठाण्यात धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देसतत तीन वर्षांपासून आंदोलनठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले

ठाणे : सतत तीन वर्षांपासून आंदोलन करणाऱ्यां  ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांवर दिवाळीपूर्वी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देणाऱ्यां  शिक्षण विभागाने अद्यापही कार्यवाही केली नाही. या दडपशाहीसह अपमानाविरोधात ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले.
महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्त्वाखाली हे राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने व धरणे आंदोलन छेडले जात आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील शासकीय विश्रामगृहासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सूपुर्द केले.
प्रलंबित मागण्या प्राप्त करून घेण्यासाठी या प्राध्यापकांनी छेडलेले हे दुसऱ्यां  टप्प्याचे आंदोलन होते. या आधी त्यांनी तालुकास्तरावर तहसीलदार कार्यालयांवर राज्यभर आंदोलन केले. या दुसऱ्यां  टप्यातही शासनास जाग न आल्यास या प्राध्यापकांनी आंदोलनाचा तिसरा टप्पा विभागीय पातळीवरील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाबाहेर करण्याचे निश्चत केले आहे. नविन पेन्शन योजना रद्दा करावी, त्त्वरीत अनुदान देण्यात यावे,शिक्षकांना नियुक्ती मान्यता देणे, वेतनासाठी आर्थिक तरतूद करणे, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करणे,प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करणे,कनिष् महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करणे, २४ वर्ष सेवा झालेल्याना निवड श्रेणी देणे,शालार्थ प्रणालीत नविन नाव टाकण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे वेतन अधिक्षकाना द्यावे,एमएड, एमफील, पीचडीसाठी आवश्यक ते सर्व लाभ व सुविधा देण्यात यावे आदी मागण्यां या प्राध्यापकांकडून करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे अध्यख प्राध्यापक दत्तात्रेय चितळे यांच्यासह शिवाजी जगताप, डी.एन.पाटील, प्रकाश माळी, चंद्रकांत शिरसागर, रवींद्र खरात, एन. वाय . वाघचौर, जितेंद्र आंबेकर प्रभाकर निकम, पुंडलिक नलावडे आदी प्राध्यापकांचा या आंदोलनात सक्रिय सहभाग आहे.
 

Web Title: Thane protest movement of junior college district teachers against oppression with repression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.