ठाणे महापालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सादर केला  बहारदार  कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:26 PM2018-10-02T15:26:01+5:302018-10-02T15:27:49+5:30

ठाणे महापालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी  बहारदार  कलाविष्कार सादर केला. 

Thane Municipal Corporation's 36th anniversary of the performance of the employees presented the outstanding arts | ठाणे महापालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सादर केला  बहारदार  कलाविष्कार

ठाणे महापालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सादर केला  बहारदार  कलाविष्कार

Next
ठळक मुद्देअधिकारी कर्मचाऱ्यांनी सादर केला  बहारदार  कलाविष्कार६ वा वर्धापन दिन गडकरी रंगायतनमध्ये उत्साहात साजरा सांस्कृतिक कार्यक्रमाला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद

ठाणे ठाणे महापालिकेच्यासांस्कृतिक कलामंचाच्यावतीने गायन ,वादन,नृत्य , लघुनाटिका अशा विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाने ठाणे महापालिकेचा ३६ वा वर्धापन दिन गडकरी रंगायतन मध्ये  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      ठाणे महापालिकेच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी सभागृह नेते नरेश मस्के,कला क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती दिपक वेतकर,नगरसेविका श्रीमती विमल भोईर,नगरसेवक संजय वाघुले,सुधीर कोकाटे,जयेश वैती अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर,उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, आदी उपस्थित होते. ठाणे महापालिकामध्ये  कार्यरत असणाऱ्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना महापालिका नेहमी  प्रोत्साहन देत असते .यंदाही महापालिकेच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांनी वर्धापन दिनानिमित्त  आपली  कला सादर केली.   ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांपासून ते अधिकारी वर्गापर्यंत सर्वानी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कलाविष्कार सादर केला. महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एका पेक्षा एक असे कलाविष्कार सादर केले.यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा असलेली मराठमोळी लावणी,भक्ती गीत,मराठी हिंदी गाणी,शाहिरी पोवाडा,बासरीवादन व लघुनाटिका अशा विविध कला या सांस्कृतिक कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी सादर केल्या.  या  संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजेंद्र पाटणकर व प्राची डिंगणकर यांनी आपल्या ओघवत्या शब्दशैलीत सूत्रसंचालन केले. महापालिकेच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला ठाणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाला महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

 

Web Title: Thane Municipal Corporation's 36th anniversary of the performance of the employees presented the outstanding arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.