ठाणे महापालिकेकडून रोज तब्बल ४९ एमएलडी पाण्याची नासाडी, लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 06:03 PM2018-07-30T18:03:21+5:302018-07-30T18:04:52+5:30

ठाणे महापालिकेकडून प्रतीदिन तब्बल ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही नासाडी टाळण्यासाठी पालिका आता काय उपाय योजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

Thane Municipal Corporation disrupts 49 MLD water every day; | ठाणे महापालिकेकडून रोज तब्बल ४९ एमएलडी पाण्याची नासाडी, लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी

ठाणे महापालिकेकडून रोज तब्बल ४९ एमएलडी पाण्याची नासाडी, लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी

Next
ठळक मुद्देशहराला ४८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठाअनेक जलवाहीन्या झाल्या जीर्ण

ठाणे - उन्हाळा सुरु झाला की जिल्ह्यासह ठाणे शहरालासुध्दा पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत लोकसंख्येच्या मानाने जास्तीचा पाणी पुरवठा होत आहे. असे असतांना शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी पालिकेकडे झगडावे लागत आहे. परंतु मुबलक पाणी असतांना सुध्दा केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतीदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे.
           ठाणे शहराची आजची लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. शहरातील सध्याच्या लोकसंख्येला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना शहरात त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु असे असतांना सुध्दा सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणी पुरवठा होत नाही, म्हणून महिलांनी तक्रार केल्याची बाब समोर आली आहे. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागातही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. सेंट्रल पिब्लक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट इंजिनीअरींग आॅर्गनायझेशनच्या नामांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज ही १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून या लोकसंख्येची पाण्याची गरज ही ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा शहराला होत असूनही अनेक ठिकाणी पाणी टंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणी पुरवठा होत होता. त्या वर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणी पुरवठा होत होता अशी माहिती हाती पालिका सुत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेला एमआयडीसी,स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहरांत पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तर शहरातील काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातुन बीलांचे वाटप होत आहे. तर काही ठिकाणी ठोक अशी बिले दिली जात आहेत. त्यामुळे कितीही पाणी वापर केला गेला याचा योग्य तो अंदाज बांधण्यात येत नाही. एकूणच ही नासाडी टाळण्यासाठी पालिका काय उपाय योजना करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


 

Web Title: Thane Municipal Corporation disrupts 49 MLD water every day;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.