भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे गेल्यामुळे रस्ता खचला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 01:29 PM2018-07-10T13:29:30+5:302018-07-10T13:33:01+5:30

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली

Thane, Kalyan commuters struggle with traffic jams after accident, cracks on bridge | भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे गेल्यामुळे रस्ता खचला

भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे गेल्यामुळे रस्ता खचला

ठाणे : मुंबई आणि ठाण्यातील पुलांची दुरावस्था समोर येत असतानाच ठाणे- भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला मंगळवारी ( 10 जुलै) तडे गेल्यामुळे रस्ता खचला आहे. आयआरबी आणि एमईपी या कंपनीचे अभियंते घटनास्थळी रवाना झाले असून दरम्यानच्या काळात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीसही उपस्थित आहेत. यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. 

मुंबई नाशिक महामार्गावर साकेत येथील पुलाला गेलेला तडा सध्या स्टीलप्लेट टाकून बुजविण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री महाजन यांनी दिली आहे. पुलावरील रस्त्याला पडलेल्या भेगेमुळे पुलाला धोका नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाजन आणि त्यांच्या पथकाने नुकतीच साकेत पुलाला भेट देऊन पाहणी केली.

 

Web Title: Thane, Kalyan commuters struggle with traffic jams after accident, cracks on bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.